वयाची पन्नाशी उलटूनही ऐश्वर्या नारकर आजही दिसतात तितक्याच ग्लॅमरस, साडीतले बोल्ड फोटो आले चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 18:48 IST2023-05-20T18:45:13+5:302023-05-20T18:48:20+5:30

Aishwarya Narkar : ऐश्वर्या नारकर यांनी नुकतेच साडीतले फोटो शेअर केले आहेत.

नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमातून अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

अभिनेत्री ५१ वर्षांची असली तरी तिच्या सौंदर्यांपुढे तरुणीदेखील फिक्क्या पडतील.

ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर सक्रीय असून त्या बऱ्याचदा फोटो शेअर करत असतात.

नुकतेच ऐश्वर्या नारकर यांनी साडीतील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोतून त्यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

५१ वर्षीय ऐश्वर्या नारकर यांचा ग्लॅमरस अंदाज पाहून ‘वय हा केवळ आकडा आहे’ अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

ऐश्वर्या नारकर मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

अपराध, धड़क, अंकगणित अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.

सध्या ऐश्वर्या नारकर 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारत आहेत.