'या' हिंदी सीरिजचा जगभरात डंका! ९ देशांत नंबर १ वर करतेय ट्रेंड, अजिबात चुकवू नका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 17:16 IST2026-01-22T17:07:08+5:302026-01-22T17:16:58+5:30
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली ही सीरिज ९ देशांमध्ये नंबर १ वर ट्रेंड करत आहे. तर एकूण २३ देशांच्या 'टॉप १०' यादीत तिने स्थान मिळवले आहे.

जर तुम्हाला क्राईम थ्रिलर आणि सस्पेन्स आवडत असेल, तर अशीच एक वेबसीरिज सध्या चर्चेत आहे, जी तुमच्या वॉचलिस्टमध्ये असायलाच हवी.

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली ही सीरिज ९ देशांमध्ये नंबर १ वर ट्रेंड करत आहे. तर एकूण २३ देशांच्या 'टॉप १०' यादीत तिने स्थान मिळवले आहे.

तर ही सीरिज आहे 'तस्करी: द स्मगलर्स वेब'. या सीरिजला आयएमडीबीवर ७.३ रेटिंग मिळाले आहे. चांगला आशय असेल तर भाषेच्या सीमा ओलांडून यश मिळवता येतं, हे या सीरिजनं सिद्ध केलंय.

एअरपोर्ट कस्टम्स आणि तस्करीच्या जगावर ही सीरिज आधारित आहे. कथा कुठेही रेंगाळत नाही, प्रत्येक एपिसोडमध्ये नवीन ट्विस्ट पाहायला मिळतो.

इमरान हाश्मीने या सिरीजमध्ये एका कर्तव्यदक्ष कस्टम ऑफिसरची भूमिका साकारली आहे. सीरिजला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर इमरान हाश्मीने आनंद व्यक्त केलाय.

"प्रत्येक देशातून मिळणारा प्रतिसाद अमूल्य असून मी तुम्हा सर्वांचा मनापासून आभारी आहे" अशा भावना त्याने व्यक्त केल्यात. इमरानच्या मते, 'तस्करी'ने त्याच्या करिअरला एक नवी दिशा दिली आहे.

"'तस्करी: द स्मगलर्स वेब' ही नेटफ्लिक्सच्या ग्लोबल नॉन-इंग्लिश टॉप १० यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचणारी पहिली सीरिज ठरली, हा एक अतिशय समाधानकारक अनुभव आहे. संपूर्ण टीमने यासाठी कठोर मेहनत घेतली आहे", असं इमरान हाश्मीने नमूद केलं.

प्रसिद्ध दिग्दर्शक नीरज पांडे यांनी या सीरिजची धुरा सांभाळली आहे. दिग्दर्शक नीरज पांडे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर 'स्पेशल २६', 'बेबी' किंवा 'ए वेन्सडे' सारखे खिळवून ठेवणारे थरारपट येतात. 'तस्करी'मध्येही नीरज पांडेंनी तीच पकड कायम ठेवली आहे.


अमृता खानविलकर 'तस्करी'मध्ये झळकली आहे. तस्करीशी संबंधित टोळीशी दोन हात करणारी एक धमाकेदार भूमिका अमृताने यात साकारली आहे. ती या सीरिजमध्ये ॲक्शन करताना पाहायला मिळाली आहे.

तसेच या सीरिजमध्ये मराठमोळी अभिनेत्री अक्षया नाईकदेखील झळकली आहे.

















