'कुछ ना कहो'मध्ये ऐश्वर्यासोबत दिसणाऱ्या या मुलीला ओळखलंत का?, आज आहे लोकप्रिय अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 15:26 IST2025-04-05T15:22:40+5:302025-04-05T15:26:42+5:30

वयाच्या १० व्या वर्षी बालकलाकार म्हणून या अभिनेत्रीने सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले.

वयाच्या १० व्या वर्षी बालकलाकार म्हणून या अभिनेत्रीने सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले.

जेनिफर विंगेटने छोट्या पडद्यावर अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. जेनिफर बॉलिवूड चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणूनही दिसली आहे.

वयाच्या १०व्या वर्षी 'अकेले हम अकेले तुम' या चित्रपटातून तिने बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर वयाच्या १२व्या वर्षी ती 'राजा की आयेगी बारात' चित्रपटात दिसली.

बालकलाकार म्हणून ती अनेक मोठ्या स्टार्ससोबत दिसली आहे. जेनिफर विंगेटने ऐश्वर्या राय बच्चन, राणी मुखर्जी, आमिर खान, मनीषा कोईराला यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर काम केले आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या 'कुछ ना कहो' या चित्रपटात ती पूजाच्या भूमिकेत दिसली होती.

जेनिफर विंगेटही लहानपणापासून टीव्हीवर काम करत आहे. ३९ वर्षीय जेनिफर विंगेटला सरस्वतीचंद्रमधील कुमुद देसाई, बेहदमधील माया मेहरोत्रा ​​आणि बेपन्नाहमधील झोया सिद्दीकी यांच्या भूमिकेत प्रेक्षकांनी पसंती दिली होती.

बेहदनंतर, ती बेहद २च्या सीक्वलमध्ये दिसली होती. यात तिच्यासोबत आशिष चौधरी आणि शिविन नारंग झळकले होते. जेनिफर आता वेब सीरिजमध्येही काम करताना दिसते आहे.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर जेनिफरचा जन्म मुंबईत अर्ध्या मराठी आणि अर्ध्या ख्रिश्चन कुटुंबात झाला. तिच्या वडिलांचे नाव हेमंत विंगेट आणि आईचे नाव प्रभा विंगेट आहे. तिचे वडील रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये काम करतात आणि आई गृहिणी आहे. तिच्या मोठ्या भावाचे नाव मोझेस विंगेट आहे.

जेनिफरने २००५ मध्ये तिचा को-स्टार करण सिंग ग्रोव्हरला डेट करायला सुरुवात केली. ती त्याला 'कसौटी जिंदगी की' या टीव्ही शोच्या सेटवर भेटली. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

९ एप्रिल २०१२ रोजी करण आणि जेनिफर यांचे लग्न झाले. लग्नाच्या २ वर्षानंतर २०१४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.