'जमील जमाली' फेम राकेश बेदींची लेकही आहे अभिनेत्री; फार कमी जणांना माहित असेल

By देवेंद्र जाधव | Updated: March 20, 2026 17:12 IST2026-03-20T16:55:07+5:302026-03-20T17:12:59+5:30

धुरंधरचे दोन्ही भाग ज्यांनी गाजवले ते अभिनेते म्हणजे राकेश बेदी. सिनेमात आपण पाहिलं की, जमील जमालीला यालिना नावाची मुलगी असते. खऱ्या आयुष्यातही राकेश बेदींना मुलगी असून ती दिसायला सुंदर आहे.

'धुरंधर'चे दोन्ही भाग ज्यांनी गाजवले ते अभिनेते म्हणजे राकेश बेदी. सिनेमात आपण पाहिलं की, जमील जमालीला यालिना नावाची मुलगी असते. खऱ्या आयुष्यातही राकेश बेदींना मुलगी असून ती दिसायला सुंदर आहे.

राकेश बेदींच्या मुलीचं नाव आहे रिद्धीमा. रिद्धिमा सौंदर्याच्या बाबतीत कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. रिद्धीमा सुद्धा अभिनेत्री आहे हे फार कमी जणांना माहित असेल

रिद्धीमाचे ग्लॅमरस फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असून, नेटकऱ्यांच्या मते तिचे सौंदर्य चित्रपटातील राकेश यांची ऑनस्क्रीन मुलगी सारा अर्जुनपेक्षाही सरस आहे.

तेरी कहानिया या म्यूझिक व्हिडीओतून रिद्धीमाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पुढे COCKAMAMIE या शॉर्टफिल्ममध्ये तिने अभिनयाची चुणुक दाखवली.

रिद्धीमाने जास्त काम केलं नसलं तरीही तिला अभिनयाची आवड असून संधी मिळेल तशी ती काही प्रोजेक्ट्समध्ये काम करत असते. रिद्धीमा अभिनयासोबतच व्यवसायामध्येही अग्रेसर आहे

रिद्धीमाच्या करिअरमध्ये राकेश बेदींचा मोठा वाटा आहे. लेकीच्या अभिनयाच्या आवडीला वडील म्हणून राकेश बेदींचा कायमच पाठिंबा आहे.

धुरंधर सिनेमात राकेश बेदी जसं त्यांची लेक यालिनावर प्रेम करतात. अगदी तसंच रिअल लाईफमध्ये राकेश आणि रिद्धीमाचं बाँडींग बघायला मिळतं