धर्मेंद्र यांच्या परिवारातील सदस्य कोण? अशी आहे 'देओल' कुटुंबाची Family Tree
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 15:10 IST2025-11-24T14:41:12+5:302025-11-24T15:10:08+5:30
देओल घराण्याचा मोठा वटवृक्ष! धर्मेंद्र यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची सविस्तर माहिती जाणून घ्या...

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि 'ही-मॅन' म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांची आज (२४ नोव्हेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ८९ व्या अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरु होते. धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर देओल कुटुंबाने धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतला. पण, अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

धर्मेंद्र यांचे कुटुंब बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या आणि यशस्वी कुटुंबांपैकी एक आहे. धर्मेंद्र यांनी दोन विवाह केले असून, त्याचं कुटुंबात ६ मुले आणि १३ नातवंडे आहेत.

धर्मेंद्र यांचे दोन सुपुत्र सनी देओल व बॉबी देओल यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. पण, चार मुली आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

धर्मेंद्र यांचं वयाच्या १९ व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याबरोबर लग्न झालं होतं. या जोडीला सनी, बॉबी ही दोन मुलगे आणि अजिता, विजेता या दोन मुली अशी एकूण चार मुलं झाली.

पुढे सनी देओलनं पूजा देओलशी लग्न केलं. या जोडीला करण देओल आणि राजवीर देओल ही दोन मुलं झाली. सनी देओलच्या मुलाचं करण देओलचं २०२३ मध्ये त्याची प्रेयसी द्रिशा आचार्यबरोबर लग्न झालं.

धर्मेंद्र यांचा दुसरा मुलगा बॉबी देओलचं तान्या आहुजाशी १९९६ मध्ये लग्न झालं. या दोघांना आर्यमान व धरम अशी दोन मुलं आहेत.

धर्मेंद्र यांच्या पहिल्या दोन मुलींबद्दल फारसं कोणाला माहीत नाही. विजेता आणि अजेता असं त्यांचं नाव असून दोघीही झगमगत्या दुनियेपासून फार लांब आहेत.

धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांची मोठी मुलगी अजिता ही अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. अजिताचं पेशानं डेंटिस्ट असलेल्या किरण चौधरी यांच्याशी लग्न झालं. या जोडीला निकिता व प्रियंका अशा दोन मुली आहेत.

तर दुसरी मुलगी विजितानं विवेक गिलबरोबर लग्न केलं असून त्यांना साहिल व प्रेरणा अशी दोन मुलं आहेत.

सिनेसृष्टीत आल्यानंतर धर्मेंद्र हे हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले. हेमा मालिनी यांच्यासाठी धर्मेंद्र यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला आणि लग्न केलं. धर्मेंद्र यांना दुसरी पत्नी हेमा यांच्यापासून ईशा व अहाना या दोन मुली आहेत.

ईशा देओलचं भरत तख्तानीबरोबर लग्न झालं होतं. पण, काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट जाला. या जोडीला दोन मुली आहेत.

धर्मेंद्र यांची लहान मुलगी अहाना देओलनं वैभव वोहराबरोबर लग्न झालं. अहाना आणि वैभव यांना तीन मुलं आहेत.

















