वयाची पन्नाशी उलटूनही 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित आजही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 21:14 IST2021-03-23T21:08:08+5:302021-03-23T21:14:18+5:30
माधुरी दीक्षितचे ग्लॅमरस फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

माधुरी दीक्षितने बॉलिवूडवर अनेक वर्षं राज्य केले. प्रेक्षकांच्या या लाडक्या धकधक गर्लने एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले.
दिल, दिल तो पागल है, हम आपके है कौन, बेटा, पुकार यांसारख्या अनेक चित्रपटात माधुरीने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आणि तिच्या या भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर देखील घेतल्या.
माधुरीच्या अभिनयाइतकेच तिच्या सौंदर्याचे देखील कौतुक होते. तिने आज वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी ती तितकीच सुंदर दिसते.
बऱ्याचदा माधुरी सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते.
माधुरी दोन मुलांची आई असली तरी ती आजही कोणत्याही तरुणीला लाजवेल इतकी सुंदर दिसते.
माधुरी दीक्षितने बॉलिवूडमध्ये बरेच सुपरहिट सिनेमे दिले असून आताही ती इंडस्ट्रीत एक्टिव्ह आहे.
सध्या ती टेलिव्हिजनवरील डान्स रिएलिटी शो डान्स दिवाने ३ची परीक्षक आहे. या शोमधील ती तिच्या वेगवेगळ्या लूकने चाहत्यांना भुरळ पाडताना दिसते.
माधुरीने 1984 साली अबोध चित्रपटातून करियरची सुरूवात केली होती. पहिलाच चित्रपट सुपरफ्लॉप ठरला होता.
त्यानंतर 1988 साली रिलीज झालेल्या तेजाब सिनेमातून ती लोकप्रिय झाली. त्यातील एक, दो, तीन.. हे गाणं आजही प्रेक्षकांच्या चांगलंच लक्षात आहे.