'ये जवानी है दीवानी' फेम अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुड न्यूज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 14:33 IST2023-01-17T14:30:02+5:302023-01-17T14:33:00+5:30
बेबी बंप फ्लॉन्ट करत या अभिनेत्रीनं चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे.

अयान मुखर्जीचा सुपरहिट चित्रपट 'ये जवानी है दीवानी' मध्ये लाराची भूमिका साकारणारी अभिनेत्री एवलिन शर्मा हिने चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली आहे.
तिने प्रेग्नेंट असल्याचे सांगितले आहे. तिची ही दुसरी गर्भधारणा आहे.
नोव्हेंबर २०२२ मध्ये, तिची मुलगी एक वर्षाची झाली आहे, ज्याबद्दल तिने सोशल मीडियावर सांगितले होते.
एवलिन शर्मा एका मुलीची आई आहे आणि आता तिने इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करून दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे.
या इंस्टाग्राम पोस्टमध्ये, एवलिन शर्मा काळ्या स्पोर्ट्स ब्रा आणि जॉगर्समध्ये आहे. एवलिन या घट्ट पण आरामदायी कपड्यांमध्ये तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. या फोटोत अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो स्पष्टपणे दिसतो आहे.
हा फोटो शेअर करत तिने लिहिले की 'मी आता तुला कुशीत खाऊ घालायला उत्सुक आहे!! दुसरे बाळ येत आहे!'
एवलिन शर्माने जून २०२१ मध्ये तुषान भिंडीशी लग्न केले. लग्नानंतर, अभिनेत्रीने नोव्हेंबर २०२१ मध्ये तिच्या मुलीला जन्म दिला. तिच्या मुलीच्या जन्मापासून, एवलिन तिच्या छोट्या राजकुमारीसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
आता एवलिन दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिच्या आयुष्यात छोट्या पाहुण्याच्या आगमनासाठी ती खूप आनंदी आणि उत्साहित आहे.