Year Ender 2024: कुणाचं कोर्ट मॅरेज तर कुणी केला पुर्नविवाह! यंदाच्या वर्षात लग्नाच्या बेडीत अडकल्या सेलिब्रिटी जोड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 16:26 IST2024-12-16T16:15:35+5:302024-12-16T16:26:45+5:30
सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. वर्ष सरताना अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. यंदाच्या वर्षात कलाकारांनी जोडीदाराबरोबर नव्या आयुष्याला सुरुवात केली.

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. वर्ष सरताना अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. यंदाच्या वर्षात कलाकारांनी जोडीदाराबरोबर नव्या आयुष्याला सुरुवात केली.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्री किर्ती सुरेशने बॉयफ्रेंड अँटनी थैटिलसोबत लग्न करून संसार थाटला आहे. किर्ती आणि अँटनी यांनी हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं आहे.
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपची लेक आलिया कश्यप हिनेदेखील काही दिवसांपू्र्वीच परदेशी बॉयफ्रेंडसोबत सात फेरे घेतली.
बॉलिवूड कपल क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट हेदेखील यावर्षी लग्नाच्या बेडीत अडकले.
रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनीही या वर्षी लग्नगाठ बांधली.
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने झहीर इकबालसोबत कोर्ट मॅरेज करत नव्या आयुष्याला सुरुवात केली.
आमिर खानची लेक आयरा खानने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधली.
तापसी पन्नूनेही गुपचूप लग्न उरकलं. तिचा पती एक टेनिस प्लेयर आहे.
या वर्षात काही सेलिब्रिटींनी पुर्नविवाह करत आयुष्याचा नवा जोडीदार निवडला. नागा चैतन्यने शोभिता धुलिपालासोबत दुसरं लग्न केलं.
अदिती राव हैदरीनेही दुसऱ्यांदा संसार थाटला आहे. सिद्धार्थसोबत तिने सात फेरे घेत नव्याने आयुष्याला सुरुवात केली.