Pamela Chopra Death: राणी मुखर्जीच्या सासूबाई पामेला चोप्रा यांचं निधन, अंत्यसंस्काराला पोहोचले बॉलिवूडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 04:45 PM2023-04-20T16:45:03+5:302023-04-20T16:57:46+5:30

या दु:खाच्या प्रसंगी आदित्य आणि राणी मुखर्जीचे सांत्वन करण्यासाठी शाहरुख खानपासून ते ऋतिक रोशनपर्यंत सगळे चोप्रा यांच्या घरी पोहोचले होते.

प्रसिद्ध फिल्ममेकर यश चोप्रा (Yash Chopra) यांच्या पत्नी पामेला चोप्रा (Pamela Chopra) यांचं आज निधन झालं. त्यांच्या निधनाने यशराज कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात मुलगा आदित्य चोप्रा, सून राणी मुखर्जी आणि छोटा मुलगा उदय चोप्रा आहेत.

राणी मुखर्जीचा जवळचा मित्र शाहरुख खान तिला या दु:खाच्या प्रसंगी आधार देण्यासाठी आला होता.

शाहरुखसोबत त्याचा मोठा मुलगा आर्यन खानही यश चोप्रांच्या घरी पोहोचला आहे.

पामेला चोप्रा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी ऋतिक रोशनही आला होता.

दु:खाच्या प्रसंगी आदित्य आणि राणी मुखर्जीचे सांत्वन करण्यासाठी अनुपम खेरही आले आहेत.

आईच्या निधनाचं दु:ख उदय चोप्राच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते. त्याने फोटोग्रार्फस समोर हात जोडले.

आदित्य चोप्राची आई पामेला यांच्या अंत्य दर्शनासाठी राकेश रोशनही आले होते.

गायक सोनू निगमही उपस्थित होता.

अभिनेता फरदीन खानही यश चोप्रा यांच्या घरी आला होता.

पामेला चोप्राच्या अंतिम दर्शनासाठी कोरिओग्राफर वैभवी मर्चंटही पोहोचली.