सोनाक्षी सिन्हा ज्याच्या प्रेमात तो जहीर इकबाल आहे तरी कोण? सलमान खानशी आहे खास नातं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 03:31 PM2024-06-11T15:31:42+5:302024-06-11T16:10:37+5:30

सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाच्या चर्चा, या महिन्यातच बांधणार लग्नगाठ

शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी लेक सोनाक्षी (Sonakshi Sinha) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. लाँग टर्म बॉयफ्रेंड जहीर इक्बालसोबत (Zaheer Iqbal) ती या महिन्याच्या शेवटी लग्न करणार आहे अशी चर्चा रंगली आहे.

सोनाक्षी आणि जहीर दोघांनी कधीच आपलं रिलेशनशिप लपवलं नाही. दोघंही हातात हात घालून फिरताना दिसले आहेत. पण सोनाक्षीच्या ज्याच्या प्रेमात आहे तो जहीर इक्बाल आहे तरी कोण?

जहीर इक्बालचा जन्म 10 डिसेंबर 1988 साली मुंबईतच झाला. तो सोनाक्षीहून एक वर्षाने लहान आहे. त्याचे वडील इकबाल रत्नासी ज्वेलरी व्यावसायिक आहेत. तसंच सलमानचे खानचे जुने मित्र आहेत.

सलमान खाननेच मित्राच्या मुलाला जहीरला बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. 2019 साली आलेल्या 'नोटबूक' सिनेमातून त्याने पदार्पण केलं होतं. मात्र हा सिनेमा फ्लॉप झाला होता.

जहीरने याआधी अभिनेत्री दीक्षा सेठ आणि सना सईदलाही डेट केलं आहे. दोघींसोबतच्या लिंकअपच्या त्याच्या बऱ्याच चर्चा झाल्या होत्या. 2018 मध्ये त्यांचे काही फोटो व्हायरल झाले होते.

सलमान खानने जहीरला खांद्यावर खेळवलं आहे. 2018 साली सलमानने जहीरच्या वडिलांचा फोटो शेअर करत लिहिले होते की, 'हा माझा लहानपणीचा मित्र इकबाल. तेव्हा ही माझी बँकच होती. मला अजूनही त्याला 2011 रुपये परत करायचे आहेत. मुलाला लाँच करत आहे मग बापाची पोस्ट तर करुच शकतो. आवडता फोटो.'

सलमान खाननेच सोनाक्षी आणि जहीरची भेट घडवून आणली होती. यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. नंतर ते प्रेमात पडले. गेल्या काही वर्षांपासून दोघंही रिलेशनशिपमध्ये आहेत.

एकमेकांच्या वाढदिवसाला दोघांनी एकमेकांसाठी प्रेमाच्या पोस्ट केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सोनाक्षीने डायमंड रिंग फ्लॉन्ट केली होती. तेव्हापासून त्यांची एंगेजमेंट झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.