रेखाच्या कुशीत असलेली ती चिमुकली कोण? आज बॉलिवूड करतेय राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 01:13 PM2022-08-20T13:13:29+5:302022-08-20T13:55:39+5:30

रेखा यांना तर सगळेच ओळखतात, पण त्यांच्या मांडीवर बसलेली ही चिमुकली नक्की आहे तरी कोण असा प्रश्न फोटोपाहून नेटकऱ्यांना पडलाय.

बालपणीचा काळ सुखाचा असं कायमच म्हटलं जातं. आपण किती मोठे झालो तरी प्रत्येकालाच बालपणीच्या आठवणींमध्ये रमायला आवडते.(फोटो इन्स्टाग्राम) बॉलिवूड सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. (फोटो इन्स्टाग्राम)

आजवर असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी कलाविश्वात स्वत:च स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

तुफान लोकप्रियता मिळविली आहे. मात्र आजही ते त्यांच्या बालपणींच्या आठवणींमध्ये रमतात. (फोटो इन्स्टाग्राम)

तसेच सध्याचं जग सोशल मीडियाचं आहे, त्यामुळे ही कलाकार मंडळी बऱ्याचवेळा आपल्या चाहत्यांसोबत त्यांच्या बालपणीच्या आठवणी शेअर करत असतात.(फोटो इन्स्टाग्राम)

अभिनेत्री रेखा यांच्या मांडीवर बसलेल्या एक चिमुकलीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ही चिमुकली आज बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून चंकी पांडेची लेक अनन्या पांडे आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

अनन्या लवकरच विजय देवरकोंडासोबत लाइगर सिनेमात दिसणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)