कोण आहे राहुल मोदी, ज्याच्यासोबत श्रद्धा कपूर अंबानीच्या फंक्शनला पोहचली ? पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 04:56 PM2024-03-04T16:56:40+5:302024-03-04T17:22:13+5:30

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणासोबतच अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने फार कमी काळात बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

श्रद्धा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धा कपूर हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या ग्रँड प्री-वेडिंग सोहळ्यात श्रद्धा कपूर जामनगरला पोहचली. यावेळी तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

या कार्यक्रमात श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी एकत्र दिसले.

श्रद्धा आणि राहुलला जामनगरमध्ये एकत्र पाहून दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज चाहते बांधत आहेत.

याआधीही हे दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. मात्र, आजपर्यंत श्रद्धा आणि राहुलने डेटिंगच्या बातम्यांवर मौन बाळगलं आहे.

राहुल मोदी बॉलिवूड चित्रपटांचा लेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक आहे.

राहुलने व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतले. तो 'तू झुठी में मक्कर' चित्रपटाचा लेखक आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर मुख्य भुमिकेत होती.

याशिवाय त्याने 'प्यार का पंचनामा 2' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' सारख्या चित्रपटांसाठी स्क्रिप्ट रायटर म्हणून काम केले आहे.