Monasila Wedding: मोनालिसाचा नवरा फरमान खान कोण? काय करतो? महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 11:53 IST2026-03-12T11:23:59+5:302026-03-12T11:53:24+5:30
मोनालिसा आणि फरमानचे लग्नानंतरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. केरळमध्ये जाऊन मोनालिसा आणि फरमानने लग्न केलं.

कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मोनालिसाने पळून जाऊन लग्न केलं आहे. बॉयफ्रेंड फरमान खानसोबत तिने आंतरधर्मीय विवाह केला आहे.

मोनालिसा आणि फरमानचे लग्नानंतरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. केरळमध्ये जाऊन मोनालिसा आणि फरमानने लग्न केलं.

फरमान मुस्लिम असल्याने मोनालिसाच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे मोनालिसाने पळून जाऊन लग्न केलं.

केरळमध्ये आधी 'कोर्ट मॅरेज' आणि त्यानंतर तिरुवनंतपुरममधील अरुमनूर नैनार मंदिरात हिंदू रीतिरिवाजांनुसार त्यांनी लग्नगाठ बांधली.

मोनालिसाचा नवरा फरमान खान हादेखील एक अभिनेता आहे. तो मॉडेलिंग करतो.

फरमान हा मुळचा महाराष्ट्राचा आहे. फेसबुकवर दीडवर्षांपूर्वी मोनालिसा आणि फरमान एकमेकांना भेटले होते.

सुरुवातीला त्यांच्यात चांगली मैत्री झाली. मात्र नंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पण त्यांच्या लग्नाला मोनालिसाच्या घरच्यांचा विरोध होता.

त्यामुळे त्यांनी पळून जात लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. मोनालिसा आणि फरमान आता काही दिवस केरळमध्ये राहणार आहेत.

















