क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 15:20 IST2025-05-03T14:54:41+5:302025-05-03T15:20:40+5:30

विराट कोहलीने तिच्या फोटोला लाइक केलं आणि एकच चर्चा झाली. पुढे विराटने स्पष्टीकरण दिलं. पण त्यामुळे अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण, याविषयीची उत्सुकता शिगेला आहे (avneet kaur)

एका फॅन पेजवर तिच्या फोटोला विराट कोहलीचं लाइक दिसलं आणि सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्या. पुढे विराटला स्पष्टीकरण द्यावं लागलं. कोण आहे ती? तिचं नाव आहे अवनीत कौर

१३ ऑक्टोबर २००१ ला पंजाब येथील जालंधर येथे अवनीतजा जन्म झाला. वयाच्या ८ व्या वर्षापासून अवनीत मनोरंजन विश्वात सक्रीय आहे.

'बालवीर', 'सावित्री एक प्रेम कहानी' , 'झलक दिखला जा', 'एक मुठ्ठी आसमान' अशा मालिकांमघ्ये अवनीतने काम केलं. पुढे २०१४ ला राणी मुखर्जीसोबत 'मर्दानी' सिनेमात अवनीत झळकली

बोल्ड फोटो, लक्झरी लाइफस्टाइल अशा गोष्टींमुळे फार कमी वयात अवनीतला लोकप्रियता मिळाली. याशिवाय सोशल मीडियावरही अवनीतचं खूप फॅन फॉलोईंग आहे

अवनीत अनेकदा विविध देशांमध्ये असलेल्या इव्हेंटला हजेरी लावत असते. ग्लॅमरस अंदाजात प्रत्येकवेळी अवनीत सर्वांचं लक्ष वेधून घेते

अवनीतला क्रिकेटची सुद्धा प्रचंड आवड असलेलं पाहायला मिळतं. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या वेळेस अवनीत भारतीय टीमला चिअर अप करायला स्टेडियममध्ये उपस्थित असलेली दिसली.

दुबईत चॅम्पियन ट्रॉफीच्या वेळेस अवनीतचा शुबमन गिलसोबतचा फोटो व्हायरल झाला. तेव्हापासून या दोघांच्या रिलेशनशीपच्या चर्चा रंगल्या. अर्थात दोघांनीही याविषयी कधीच अधिकृत खुलासा केला नाही