SEE PICS : ‘कल हो ना हो’ची जिया आठवते? इतकी बदलली झनक शुक्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 08:00 AM2020-12-15T08:00:00+5:302020-12-15T08:00:02+5:30

फोटो पाहून थक्क व्हाल

शाहरूख खानचा ‘कल हो ना हो’ या गाजलेल्या सिनेमातील चिमुकली जिया आठवते? गोंडस चेह-याची, निष्पाप जिया आता मोठी झाली आहे. तिचे खरे नाव झनक शुक्ला.

या झनक शुक्लाला आज पाहाल, तर तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, इतकी ती बदलली आहे.

‘कल हो ना हो’ या सिनेमात झनकने प्रीति झिंटाच्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती. हा सिनेमा 2003 साली रिलीज झाला होता.

यानंतर झनक टीव्हीवरच्या ‘करिश्मा का करिश्मा’ या लोकप्रिय मालिकेतही दिसली होती. ही मालिका चांगलीच गाजली होती.

90च्या दशकात बालकलाकार म्हणून ती प्रसिद्धीच्या शिखरावर होती.‘करिश्मा का करिश्मा’ या मालिकेत झनकने रोबोटची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका बच्चेकंपनीसह तमाम रसिकांना भावली होती.

झनक ही अभिनेत्री सुप्रिया शुक्लाची मुलगी आहे. सुप्रिया शुक्लाने विद्या बालनच्या परिणीता या सिनेमात भूमिका साकारली होती. शिवाय कुमकुम भाग्य या मालिकेतही दिसली होती.

आपल्या आई वडिलांचा वारसा चालवत अभिनयाच्या दुनियेत त्यांच्या मुलांनी कमाल केल्याची अनेक उदाहरणं आहेत.मात्र बालपणीच आपल्या अभिनयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी झनक अचानक पडद्यापासून दूर गेली.

सोनपरी मालिकेनंतर रसिकांना तिचे दर्शन झाले नाही. अभिनयाच्या क्षेत्रात परतण्याचा झनकचा तूर्तास तरी कोणताही इरादा नाही.

सध्या झनक तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत आहे. तसेच ती सतत सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टीव्ह असते. इन्स्टाग्रामवर झनकचे बरेच फोटो असून त्यात तिला ओळखणं कठीण आहे.ती आपला बराच वेळ मित्र मैत्रिणींसह घालवते.

भविष्यात झनकला सामाजिक कार्य करायची इच्छा आहे. तिला फिरण्याचीही खूप आवड आहे. वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत ती तेथील संस्कृती जाणून घेत तिथले खास गोष्टी कॅम-यात कैद करत असते.