कुठे गायब आहे 'गरम मसाला'मधील ही अभिनेत्री? पहिलाच हिट सिनेमा देऊन बॉलिवूडला केला रामराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:33 IST2025-12-17T12:18:14+5:302025-12-17T12:33:52+5:30
Neetu Chandra : बॉलिवूडमध्ये अक्षय कुमारच्या चित्रपटांमधून पदार्पण करणाऱ्या अनेक अभिनेत्रींचे नशीब चमकले, मात्र काही अभिनेत्री काळाच्या ओघात चंदेरी दुनियेपासून दूर गेल्या. चाहते आजही त्यांना विसरलेले नाहीत, नीतू चंद्रा ही त्यापैकीच एक आहे.

बॉलिवूडमध्ये अक्षय कुमारच्या चित्रपटांमधून पदार्पण करणाऱ्या अनेक अभिनेत्रींचे नशीब चमकले, मात्र काही अभिनेत्री काळाच्या ओघात चंदेरी दुनियेपासून दूर गेल्या. चाहते आजही त्यांना आठवतात, नीतू चंद्रा ही त्यापैकीच एक आहे.

नीतू चंद्रा पहिल्यांदा बॉलिवूडच्या 'गरम मसाला' या सुपरहिट चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट २००५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात नीतू अक्षय कुमारच्या विरुद्ध भूमिकेत झळकली होती. चित्रपटात अक्षयसोबत तिचे छोटे रोमँटिक सीन होते, ज्यामुळे ती प्रेक्षकांच्या नजरेत आली. या हिंदी चित्रपटात तिने 'स्वीटी' नावाच्या एअरहोस्टेसची भूमिका साकारली होती.

'गरम मसाला'च्या यशानंतर ती २००७ मध्ये मधुर भांडारकर यांच्या 'ट्रॅफिक सिग्नल' मध्ये दिसली. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही.

हिंदी चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर नीतूने दाक्षिणात्य चित्रपटांकडे मोर्चा वळवला. पण तिथेही तिला फारसे यश मिळाले नाही. २००९ मध्ये तिचा 'यावरुम नालम' हा तमिळ चित्रपट बराच यशस्वी ठरला, तर 'गोदावरी' हा चित्रपट फ्लॉप झाला.

हिंदी आणि साउथमध्ये नशीब आजमावल्यानंतर, २०११ मध्ये तिने 'देसवा' या भोजपुरी चित्रपटात काम केले. विशेष म्हणजे तिने स्वतः या चित्रपटाची निर्मितीही केली होती.

बॉलिवूडव्यतिरिक्त नीतू चंद्रा 'होम स्वीट होम' या ग्रीक चित्रपटाचाही भाग होती. यात तिने एका भारतीय मुलीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिला ग्रीक भाषा शिकावी लागली आणि तिने स्वतः डबिंगही केले.

याशिवाय ती 'गाउन अँड आऊट इन बेवर्ली हिल्स' आणि 'नेवर बॅक डाऊन: रिव्होल्ट' यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये दिसली. तिला शेवटचे 'कुछ लव जैसा' मध्ये पाहिले गेले होते.

नीतू चंद्रा जरी हिंदी चित्रपटांपासून बराच काळ दूर असली, तरी ती अभिनयाच्या क्षेत्रात सतत कार्यरत आहे. यासोबतच ती तिचे मूळ राज्य बिहारमधील सामाजिक आणि व्यावसायिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग नोंदवत असते.

बिहार निवडणुकीदरम्यान नीतू चंद्राचे नाव खूप चर्चेत आले होते. निवडणूक आयोगाने तिला 'बिहार निवडणूक ब्रँड ॲम्बेसेडर' या पदावरून हटवले होते. निवडणूक आयोगाच्या धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

















