मिस इंडिया मधु सप्रे कुठे आहे? 1 फोटोशूटने बर्बाद केलं करिअर, आता जगतंय असं आयुष्य, ओळखणं झालंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 13:23 IST2023-07-14T10:56:49+5:302023-07-14T13:23:59+5:30
देशाची पहिली सुपरमॉडल मधु सप्रे आताश: क्वचित एखाद्या फॅशन शो वा पेज थ्री पार्टीमध्ये दिसते. पण लोक तिला अजूनही विसरू शकलेले नाहीत.

ग्लॅमर इंडस्ट्री उगवत्या सूर्याला नमस्कार करते. स्क्रिन व इव्हेंटपासून दूर झालेल्या लोकांना ही इंडस्ट्री लगेच विसरते. पण काही अपवाद असतातच. इंडस्ट्रीपासून दूर असूनही अनेक नावं आजही विसरता आलेली नाहीत. मधु सप्रे (Madhu Sapre) हे असंच एक नाव.

देशाची पहिली सुपरमॉडल मधु सप्रे आताश: क्वचित एखाद्या फॅशन शो वा पेज थ्री पार्टीमध्ये दिसते. पण लोक तिला अजूनही विसरू शकलेले नाहीत. 52 वर्षीय मॉडेलने लग्नानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, परंतु सर्वात वादग्रस्त जाहिरातीसाठी फोटोशूट केल्यामुळे ती प्रकाशझोतात आली. आजही लोकांना मधु सप्रेने मिलिंद सोमणसोबत केलेलं न्यूड फोटोशूट लक्षात आहे.

एकेकाळी मधु ही सुपरमॉडेल होती. ग्लॅमर इंडस्ट्रीत तिचा मोठा दबदबा होता. आज ती 52 वर्षाची झालीये. तिचे ताजे फोटो पाहाल तर तिला ओळखूही शकणार नाही, इतकी ती बदलली आहे.

आज मधुचा वाढदिवस. 1971 साली आजच्याच दिवशी तिचा जन्म झाला होता. ती एक चांगली अॅथलीट होती. पण अचानक मॉडेलिंगच्या दुनियेत आली आणि बघता बघता सुपर मॉडेल बनली.

मॉडेल म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणा-या मधुने 1992 मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला. यानंतर चार वर्षांनी तिच्या एका जाहिरातीने असा काही वाद ओढवून घेतला की मधुला जाहिरात क्षेत्रानं जणू बहिष्कार टाकला.

1995 मध्ये एका शूज तयार करणाऱ्या एका कंपनीने मधु व मिलिंद सोमण या दोघांना घेऊन एक न्यूड जाहिरात तयार केली होती. या जाहिरातीची गणती आतापर्यंतच्या सर्वात वादग्रस्त जाहिरातींमध्ये होते. मधु आणि मिलिंद या जाहिरातीमध्ये न्यूड झाले होते. पायात बुट आणि गळ्यात अजगर असं हे फोटोशूट होतं. या जाहिरातीवरून प्रचंड वाद झाला होता.

मुंबई पोलिसांनी 1995 मध्ये मधु व मिलिंदविरोधात गुन्हाही दाखल केला होता. जाहिरातीत अजगराच्या वापरावरही टीका झाली होती. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅक्टअंतर्गत संबंधित जाहिरात कंपनीविरोधातही गुन्हा दाखल केला गेला होता. तब्बल 14 वर्षे हा खटला सुरु होता. अखेर 14 वर्षांनंतर मिलिंद व मधु दोघांनाही निर्दोष सुटले होते. पण तोपर्यंत मधुचं करिअर बर्बाद झालं होतं.

2001 साली मधूने इटलीतील आईस्क्रिम बिझनेसमॅन जिआर मारियासोबत लग्न केलं आणि आपल्या कुटुंबीयांसह इटलीत स्थायिक झाली. मात्र अधूनमधून भारतातील फॅशन शोज आणि पेज थ्री पार्टीजमध्ये दिसत असते.

मधू आणि जिआन यांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर या दोघांनी नोव्हेंबर लग्न केलं. 2012मध्ये मधूने मुलीला जन्म दिला.

मुधची मुलगी इंदिरा आता 10 वर्षांची आहे. मधु सप्रे इटलीला राहतात, पण ती मुंबईला खूप मिस करते. ती मुंबईत लहानाची मोठी झाली आणि अजूनही तिथल्या लोकल ट्रेन्स आणि स्ट्रीट फूडपासून सगळं मिस करते.

















