आजारपणामुळे चेहरा झाला पॅरलाइज; कलाविश्व दुरावलेल्या 'आँखे'फेम अभिनेत्रीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 02:02 PM2024-02-05T14:02:12+5:302024-02-05T14:09:55+5:30

raageshwari: या आजारपणामुळे जवळपास ४ वर्ष ती अंथरुणाला खिळून होती.

90 चा काळ गाजवणारी रागेश्वरी लूंबा आठवते का तुम्हाला? गोविंदा, चंकी पांडे, सैफ अली खान, सुनील शेट्टी यांसारख्या अनेक दिग्गजांसोबत तिने स्क्रीन शेअर केली होती.

अनेक गाजलेल्या सिनेमात झळकलेली रागेश्वरी एकाएकी इंडस्ट्रीतून दूर गेली. त्यामुळे सध्या ती काय करते, कशी दिसते असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडतात.

1993 साली 'आंखे' या सिनेमातून रागेश्वरीने इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. या सिनेमात तिच्यासोबत चंकी पांडे आणि गोविंदा यांनी स्क्रीन शेअर केली होती.

रागेश्वरीने 'मुंबई से आया मेरा दोस्त', 'तुम जियो हजारों साल', 'दिल कितना नादान है', 'मैं खिलाड़ी तू अनाड़ी' आणि 'जिद' यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं.

रागेश्वरीने मॉडलिंगपासून तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. रागेश्वरी उत्तम गायिका असून ती संगीत क्षेत्रातही कार्यरत होती. विशेष म्हणजे करिअरच्या शिखरावर असताना तिने अचानकपणे कलाविश्वातून काढता पाय घेतला.

रागेश्वरी यश, लोकप्रियता सारं काही उपभोगत असताना अचानक तिला बेल्स पाल्सी या रोगाचं निदान झालं. ज्यामुळे तिचं सगळं आयुष्य बदलून गेलं.

२००० साली रागेश्वरीला या रोगाचं निदान झालं. ज्यामुळे तिच्या चेहऱ्याच्या उजवा भाग पॅरलाइज झाला. या आजारपणामुळे तिला संगीत विश्वापासून फारकत घ्यावी लागली.

या आजारपणामुळे जवळपास ४ वर्ष ती अंथरुणाला खिळून होती. त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर तिने इंडस्ट्रीत कमबॅक केलं. बिग बॉस 5 मध्ये ती बऱ्याच वर्षांच्या ब्रेकनंतर झळकली.

रागेश्वरी सध्या इंग्लंडमध्ये स्थित असून पती आणि मुलीसोबत राहते. सोशल मीडियावर ती कमालीची सक्रीय असून कायम तिच्याविषयीचे नवनवीन अपडेट ती चाहत्यांना देत असते.

रागेश्वरीने सुधांशू स्वरुप यांच्याशी २०१४ मध्ये लग्न केलं. त्यानंतर तिने २०१६ मध्ये तिच्या लेकीला जन्म दिला.