परिणीती चोप्राच्या या लूकवर खिळून राहिली चाहत्यांची नजर, पहा तिचा हा लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 20:45 IST2019-03-27T20:45:00+5:302019-03-27T20:45:00+5:30

परिणीती चोप्रा सध्या 'केसरी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतीच ती मुंबईतील जुहूमध्ये दिसली. यावेळी तिच्या लूककडे चाहते एक टक पाहत राहिले.
परिणीतीच्या 'केसरी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८६.३२ कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट शंभर कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करू शकतो.
अनुराग सिंग दिग्दर्शित 'केसरी' चित्रपटात परिणीती सोबत मुख्य भूमिकेत अक्षय कुमार दिसणार आहे.
सारागढीच्या युद्धावर आधारीत असलेल्या 'केसरी' चित्रपटाने २०१९मधील सर्वात मोठी ओपनिंग मिळाली आहे.
नुकतीच परिणीतीने 'जबरिया जोडी' चित्रपटाचे शूटिंगदेखील पूर्ण केले आहे.
'हंसी तो फसी' चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत परिणीतीने काम केल्यानंतर आता ही जोडी पुन्हा एकदा 'जबरिया जोडी' चित्रपटात झळकणार आहे.
'जबरिया जोडी'मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा व परिणीती चोप्रा यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.