विनोद खन्नाच्या दुसऱ्या मुलाला कधी पाहिलंय का? अक्षय खन्नापेक्षा कैकपटीने दिसतो स्मार्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 06:00 AM2022-08-06T06:00:00+5:302022-08-06T06:00:00+5:30

Sakshi khanna: साक्षी त्याच्या दमदार पर्सनालिटीमुळे कायम चर्चेत असतो. त्यामुळे सोशल मीडियावरही त्याचा चाहतावर्ग बराच मोठा आहे.

बॉलिवूडचा हॅण्डसम हंक म्हणून एकेकाळी अभिनेता विनोद खन्नाकडे पाहिलं जायचं.

गुड लुकिंग आणि उत्तम अभिनय यांच्या जोरावर विनोद खन्ना यांनी त्यांचा स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला होता. त्यात तरुणींमध्ये तर त्यांची तुफान क्रेझ होती.

विनोद खन्ना यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या मुलाने अक्षय खन्नानेही बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. मात्र, त्याचाही कलाविश्वातील वावर कमी झाला आहे.

विनोद खन्ना यांना साक्षी खन्ना हा धाकटा लेक असून तो कलाविश्वात फारसा सक्रीय नाही. मात्र, सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टीव्ह आहे.

साक्षी त्याच्या दमदार पर्सनालिटीमुळे कायम चर्चेत असतो. त्यामुळे सोशल मीडियावरही त्याचा चाहतावर्ग बराच मोठा आहे.

साक्षी चित्रपट निर्माता असल्याचं सांगण्यात येतं.

साक्षी सोशल मीडियावर कायम त्याचे नवनवीन फोटो शेअर करत असतो.