२७व्या वर्षी विधवा होण्याचं दु:ख, पतीच्या निधनानंतर ९ वर्षांनी मराठमोळ्या अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 16:57 IST2025-03-27T16:21:21+5:302025-03-27T16:57:28+5:30

अवघ्या २७व्या वर्षीच अभिनेत्रीच्या नशिबी विधवा होण्याचं दु:ख आलं. पतीच्या निधनानंतर तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता.

शाहरुख खानच्या 'चक दे इंडिया' सिनेमात झळकलेल्या अभिनेत्री आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. याच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे विद्या माळवदे.

विद्याने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र ती पर्सनल लाइफमुळे अधिक चर्चेत होती. इंडस्ट्रीत येण्याआधी विद्या एक एअर होस्टेस होती.

तिने २४व्या वर्षी पायलट असलेल्या अरविंद सिंह बग्गा यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर ३ वर्षांतच एका विमान अपघातात तिच्या पतीचं निधन झालं.

अवघ्या २७व्या वर्षी विद्याच्या नशिबी विधवा होण्याचं दु:ख आलं. पतीच्या निधनानंतर तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता.

पतीच्या निधनानंतर विद्याने एअर होस्टेसची नोकरी सोडली आणि ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये आली. २००९मध्ये विद्याने संजय दयामा यांच्याशी लग्न केलं.

मात्र, ती आई होऊ शकली नाही. विद्या ही दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांची भाची आहे.

विद्याने 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा','किडनॅप','बेनाम','नो प्रॉब्लेम' या सिनेमांमध्ये काम केलं. शिवाय ती 'मिसमॅच्ड' या वेबसीरिजमध्येही दिसली. काही रिअॅलिटी शोजमध्येही तिने भाग घेतला.