Uorfi Javed : "माझ्या जवळ ये आणि मला मिठी मार"; उर्फी जावेदने सांगितला कास्टिंग काउचचा भयंकर अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 16:57 IST2025-01-12T16:44:13+5:302025-01-12T16:57:40+5:30
Uorfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेदने तिला आलेला कास्टिंग काउचचा भयंकर अनुभव सांगितला आहे.

अभिनेत्री उर्फी जावेदने तिला आलेला कास्टिंग काउचचा भयंकर अनुभव सांगितला आहे.
उर्फीने बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत कास्टिंग काउचबाबत मोठा खुलासा केला आहे.
"मी जेव्हा मुंबईत नवीन आली तेव्हा एका डायरेक्टरने मला आपल्या घरी ऑडिशनसाठी बोलावलं."
"कॅमेरा पण नव्हता. तो मला म्हणाला, तू माझी गर्लफ्रेंड आहेस अशी एक्टिंग कर. माझ्या जवळ ये आणि मला मिठी मार."
"मला वाटलं की कोणत्या प्रकारची ऑडिशन आहे?, कॅमेरा कुठे आहे? पण नाही म्हणण्याऐवजी मी ते केलं."
"सर, मी जाते असं त्यानंतर मी त्याला सांगितलं. मी अशा अनेक घटनांमधून गेलेली आहे" असं उर्फीने म्हटलं आहे.
उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. तिचे असंख्य चाहते आहेत.
उर्फी तिच्या अतरंगी फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा अजब फॅशन सेन्स नेहमीच लोकांचं लक्ष वेधून घेत असतो.