Sonakshi Sinha - Zaheer Iqbal : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल या Cute जोडीचे Unseen Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 08:54 PM2024-06-23T20:54:25+5:302024-06-23T21:22:47+5:30

अभिनेत्री सोनाक्षी आणि झहीर इक्बाल सध्या चर्चेत आहेत.

अभिनेत्री सोनाक्षीने बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

सोनाक्षी आणि झहीरच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्टपणे दिसून आला.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी रविवारी रजिस्टर मॅरेज पद्धतीने लग्न केलं.

अभिनेता शत्रुघ्न सिन्हा हे आपल्या लाडक्या लेकीसाठी आनंदी असल्याचं फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.

सोनाक्षी आणि झहीर यांनी व्हाईट रंगाचे आउट्फिट घातल्याचे दिसत आहे. सोनाक्षीने आपल्या साडीला फरफेक्ट मॅच होईल असा न्यूड मेकअप करणे पसंत केले आहे. तसंच केसात गजरा माळला होता. तर झहीर यानेसुद्धा सोनाक्षीच्या कपड्यांना परफेक्ट मॅच होईल अशा कपड्यांची निवड केली आहे.

सोनाक्षी व झहीर यांच्या लग्नाआधीचे विधी शुक्रवारपासून सुरू झाले होते. पहिल्या दिवशी मेहंदी समारंभ झाला. त्यानंतर शनिवारी सोनाक्षीच्या घरी म्हणजेच मुंबईतील ‘रामायणा’ बंगल्यावर खास पूजा ठेवली होती

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचं मुंबईत ग्रँड रिसेप्शनही होणार असल्याची माहिती आहे.

सोनाक्षी आणि झहीर यांच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीला अनेकांना आमंत्रित केले असून मुंबईतील दादर परिसरातील बॅस्टियन रेस्टॉरंट येथे पार पडणार आहे.

सोनाक्षी हिंदू आहे आणि जहीर मुस्लिम आहे. त्यामुळे सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचं लग्न विशेष विवाह कायद्यानुसार झालं आहे. यामध्ये कोणत्याही धर्माचे विधी पाळले जात नाहीत.

सोनाक्षी आणि झहीर गेल्या ७ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी कधीच आपलं नातं लपवलं नाही. दोघंही हातात हात घालून फिरताना दिसले आहेत. सोनाक्षीचा पती झहीर इक्बाल हा तिच्याहून एक वर्षाने लहान आहे.

झहीरला सलमान खानने बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. 2019 साली आलेल्या 'नोटबूक' सिनेमातून त्याने पदार्पण केलं होतं. मात्र हा सिनेमा फ्लॉप झाला होता. सलमान खाननेच सोनाक्षी आणि झहीरची भेट घडवून आणली होती. यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. नंतर ते प्रेमात पडले होते.