लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 17:14 IST2024-10-02T17:02:35+5:302024-10-02T17:14:37+5:30
एका छोट्या भूमिकेने अभिनेत्रीचं नशीबच बदलून टाकलं. रातोरात स्टार झाली.

तृप्ती डिमरीने 'कला', 'बुलबुल', 'लैला मजनू' यांसारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम करून आपले अभिनय कौशल्य सिद्ध केलं होतं. या चित्रपटांमध्ये तिची चमकदार कामगिरी असूनही अभिनेत्रीला स्टारडम आणि लोकप्रियता मिळाली नाही.
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूर स्टारर 'ॲनिमल' चित्रपटातील एका छोट्या भूमिकेने अभिनेत्रीचं नशीबच बदलून टाकलं. रातोरात तृप्ती स्टार झाली.
छोट्याशा भूमिकेने अभिनेत्रीला नाव आणि प्रसिद्धी मिळवून दिली, जी 'लैला मजनू', 'बुलबुल' आणि 'कला' मध्ये लीड रोल करूनही मिळू शकली नाही.
एकीकडे तृप्ती तिला मिळत असलेली लोकप्रियता एन्ज़ॉय करत आहे, तर दुसरीकडे आता आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखं तिला वाटत आहे.
द हॉलिवूड रिपोर्टरशी बोलताना अभिनेत्री म्हणाली की, स्टारडमचेही अनेक तोटे असतात. "ॲनिमल रिलीज होण्यापूर्वी मी भाजी घेण्यासाठी बाजारात जात असे."
"हे खूप मनोरंजक आहे कारण एकीकडे तुम्हाला अभिनेत्री म्हणून अशीच लोकप्रियता हवी असते, तर दुसरीकडे मला माझं स्वातंत्र्य जास्त आवडतं."
"मला रस्त्यावर एकटं फिरणं, मित्रांसोबत वेळ घालवणं आणि स्ट्रीट फूड खायला खूप आवडतं. पूर्वी मी या सर्व गोष्टी कोणत्याही अडचणीशिवाय करू शकत होते."
"आता मात्र मला अधिक सावध राहावं लागतं. माझं स्वातंत्र्य हिरावून घेतलं आहे असं वाटतं" असं तृप्ती डिमरीने म्हटलं आहे.
तृप्तीचं मत आहे की, यामुळेच बहुतेक स्टार्स एकांत मिळवण्यासाठी परदेशात जातात. शूटिंगमधून वेळ काढून सुट्टी साजरी करणं तिच्यासाठी खूप महत्त्वाचं असल्याचं ती सांगते.
तृप्ती डिमरीने आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे असंख्य चाहते आहेत.