टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानी 'राधे' सिनेमात बनणार जॅकी श्रॉफची बहिण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 15:27 IST2021-01-07T15:27:32+5:302021-01-07T15:27:32+5:30

दिशा पटानी लवकरच सलमान खानचा चित्रपट 'राधे : योर मोस्ट वॉन्टेड भाई'मध्ये दिसणार आहे.
चित्रपटात जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुड्डा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
चित्रपटाबद्दल अद्याप जास्त माहिती समोर आली नाही. मात्र असे समजले की यात दिशा जॅकी श्रॉफच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे.
दिशा रियल लाइफमध्ये जॅकी श्रॉफचा मुलगा टायगरची गर्लफ्रेंड आहे. त्यामुळे दोघांना रुपेरी पडद्यावर भाऊ बहिणीच्या भूमिकेत पाहणे कमालीचे ठरणार आहे.
चाहत्यांचे म्हणणे आहे की दिशाच्या रिल रोलवर रियल लाइफचा परिणाम झालेला पहायला मिळाला.
चित्रपटात रणदीप हुड्डा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
राधे चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभूदेवा करत आहे. हा चित्रपट ईदला रिलीज होण्याची शक्यता आहे.
निर्मात्यांनी या चित्रपटाचे सर्व अधिकार झी स्टुडिओजला २३० कोटींना विकले आहेत. ही बॉलिवूडमधील सर्वात मोठी डील असल्याचे बोलले जात आहे. (सभी फोटो इंस्टाग्राम)