साउथच्या या कलाकारांनी बदललाय स्वतःचा धर्म, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 16:27 IST2022-02-02T16:22:01+5:302022-02-02T16:27:47+5:30

दक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपला मुळ धर्म बदलून दुसऱ्या धर्मात प्रवेश केला आहे.

Nayanthara– नयनतारा ही साउथच्या सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तमिळमध्ये तिने अनेक चित्रपट केले आहेत. नयनतारा ही सुरुवातीला ख्रिचन होती. मात्र त्यानंतर तिने हिंदू धर्माचा स्वीकार केला.

A R Rahman – ए आर रहमान हे दक्षिणेसह देशातील एक मोठे संगीतकार, गीतकार आहेत. रहमान यांनी १९८९ मध्ये आपला हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारला. सुरुवातीला त्यांचे नाव दिलीपकुमार असे होते. त्यानंतर त्यांनी अल्लारखा रहमान हे नाव ठेवले.

Nagma– नगमा हिने बॉलिवूडसह दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटात काम केले आहे. तिचे नाव काही काळ क्रिकेटर सौरव गांगुलीसोबत देखील जोडले गेले होते. नगमाची आई मुस्लिम होती, तर वडील हिंदू होते. काही वर्षांत नगमा हिने ईसाई धर्माचा स्वीकार केला.

Lissy – लिसी दक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. १९९० साली तिने ज्येष्ठ दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याशी लग्न केले. त्यानंतर तिने आपल्या धर्माचा त्याग करत हिंदू धर्म स्वीकारला.

Khushabu – खुशबू या साउथमधील ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. २०० पेक्षा जास्त चित्रपट तिने काम केले आहे. त्यामुळे तामिळ, तेलगू, कन्नडसह अनेक चित्रपट केले. तिने सुंदर सी यांच्या सोबत लग्न केल्यानंतर मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्माचा स्वीकार केला.

Monica – मोनिका हिनेदेखील अनेक चित्रपटात काम केले आहे. मोनिका हिने २०१४ मध्ये मुस्लिम धर्माचा स्वीकार केला. आता ती एम जे रहिमा या नावाने ओळखली जाते.

Jomol – दाक्षिणात्य अभिनेत्री जोमोल यांनी अनेक मल्याळम चित्रपटात काम केले आहे. तिने चंद्रशेखर पिल्लई यांच्या सोबत लग्न केल्यानंतर ख्रिश्चन धर्माचा त्याग करून हिंदू धर्म स्वीकारला. त्याचप्रमाणे आपले नाव देखील गौरी असे ठेवले.

Yuvan Shankar Raja– युवान शंकर राजा यांनी देखील आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती देत आपण इस्लाम धर्म स्वीकारल्याचे ट्विटरवर सांगितले.