पाकिस्तानी अभिनेत्याने उडवली 'पठाण'ची खिल्ली, एका वाक्यात सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 12:40 PM2023-03-28T12:40:34+5:302023-03-28T12:51:16+5:30

शाहरुख खानच्या पठाण सिनेमाने कमाईचे अनेक विक्रम रचले. भारतातील आजपर्यंतचा सर्वात कमाई करणारा सिनेमा म्हणून पठाणची नोंद झालीय.

शाहरुख खानच्या पठाण सिनेमाने कमाईचे अनेक विक्रम रचले. भारतातील आजपर्यंतचा सर्वात कमाई करणारा सिनेमा म्हणून पठाणची नोंद झालीय.

बॉक्स ऑफिससह मीडियातही शाहरुख आणि पठाण चर्चेचा मुद्दा ठरला होता. विशेष म्हणजे, ज्या सिनेमाला कडाडून विरोध झाला, त्याच सिनेमाने देशातील सिनेमांच्या कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

बॉलिवुडलाच नाही तर साऊथच्या सिनेमा, सेलिब्रेटींना जमले नाही तेवढी कमाई शाहरुखने एका चित्रपटातून केली आहे.

चाहत्यांनी शाहरुखच्या पठाणला डोक्यावर उचलून धरले. ऑनलाईन प्लॅटफॉ़र्मवरही पठाण खूप चालला. अर्थात शाहरुखला मालामाल बनवून गेला. त्यानंतर, शाहरुखचं बॉलिवूडमधूनही कौतुक झालंय.

मात्र, शाहरुखच्या पठाण सिनेमाचं वर्णन किंवा विश्लेषण करताना पाकिस्तानी आभिनेता यासिर हुसैन याने खिल्ली उडवली आहे. पठाण सिनेमा म्हणजे व्हिडिओ गेम पाहात असल्याचं यासीरने म्हटलंय.

यासीर हुसैनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पठाणबद्दल भाष्य केलंय. ''जर तुम्ही मिशन इम्पॉसिबल पाहिला असेल तर शाहरुख खानचा पठाण चित्रपट तुम्हाला स्टोरीलेस व्हिडिओ गेमपेक्षा वेगळा वाटणार नाही'', असे यासीरने म्हटलंय.

भारतातही अनेकांनी पठाण सिनेमाच्या कथेत दम नसल्याचे म्हटले, त्यासोबत एक्शन सीनचा भडीमार असल्याने अनेकांच्या पंसतीला हा चित्रपट उतरला नाही. तर, काहींनी जाणीवपूर्वकच विरोध केला आहे. पण, चाहत्यांनी शाहरुखला प्रतिसादही भरभरुन दिलाय.

देशभक्तीवर आधारित हा चित्रपट असून पठाण देशासाठी काम करणारा रॉ एजंट असल्याचं या सिनेमातून दिसून येतंय. सोल्जर वो होता है जो, देश ने मेरे लिए क्या किया, ये नही पुछता, बल्की, मै देश के लिए क्या कर सकता हूँ... ये पूँछता हे, असा पठाण सिनेमातील शेवटचा डायलॉग आहे.

दरम्यान, शाहरुखच्या या सिनेमाने आत्तापर्यंत १००० कोटी रुपयांचा बिझनेस केल्याची माहिती आहे. त्यामुळे, तो सिनेमा सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत अग्रस्थानी आहे.

शाहरुख खान सध्या येणारी फिल्म जवानच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. नुकतेच, त्याच्या ताफ्यात एक कार आणल्याची खबर लागली आहे. शाहरुखने रोल्स रॉयस कलिनन ब्लॅक बॅज एसयुव्ही खरेदी केली आहे. या लक्झरी कारची किंमत ८ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.