साऊथ स्टार नितीनचा शाही लग्नसोहळा, पाहा Dreamy Weddingचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 14:17 IST2020-07-27T13:57:45+5:302020-07-27T14:17:29+5:30

गर्लफ्रेन्डसोबत बांधली लग्नगाठ

दाक्षिणात्य स्टार नितीन आणि शालिनी कंडूकुरी यांनी काल लग्नगाठ बांधली.

काल रात्री एका छोट्याशा सोहळ्यात त्यांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या.

कोराना व्हायरसमुळे अगदी काही मोजक्या लोकांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला.

खरे तर नितीनला दुबईत डेस्टिनेशन वेडिंग करायचे होते. पण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्याला हा प्लान रद्द करावा लागला.

या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दोघांनीही एकमेकांना एकमेकांच्या सुखदु:खात साथ देण्याचे वचन दिले.

लग्नाच्या फोटोत नितीन व शालिनीची जोडी प्रचंड सुंदर दिसतेय.

लग्नात शालिनीने गोल्डन कलरची साडी नेसली होती सोबत हेवी ज्वेलरी कॅरी केली होती.

तर नितीनने रेड-गोल्डन कलरची शेरवानी घातली होती. सोबत एक शानदार नेकपीस घातला होता.

अलीकडे दोघांचा साखरपुडा झाला होता. साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

नितीन व शालिनी आठ वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते.

नितीनने अनेक साऊथ सिनेमांमध्ये काम केलेय. त्याचा ‘भीष्म’ हा तेलगू सिनेमा चांगलाच गाजला होता.

नितीन हा टॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माते सुधाकर रेड्डी यांचा मुलगा आहे.

2002 मध्ये जयम या चित्रपटातून त्याने त्याच्या अ‍ॅक्टिंग करिअरला सुरूवात केली होती.

पहिल्याच सिनेमासाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

Read in English

टॅग्स :TollywoodTollywood