Rhea Chakraborty : "...म्हणूनच मी सुशांतला त्यादिवशी ब्लॉक केलं"; रिया चक्रवर्तीने सांगितलं नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 14:21 IST2025-02-24T14:04:30+5:302025-02-24T14:21:08+5:30

Rhea Chakraborty And Sushant Singh Rajput : रिया चक्रवर्तीने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या शेवटच्या मेसेजबद्दल सांगितलं आहे.

रिया चक्रवर्तीने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या शेवटच्या मेसेजबद्दल सांगितलं आहे. ९ तारखेला त्याने मला मेसेज केला होता आणि तू कशी आहेस असं विचारल्याचं तिने सांगितलं.

"सुशांतला माहित होतं की माझी तब्येत ठीक नाही. मात्र ८ ला मी दुपारी घरी आली होती आणि ९ ला दुपारपर्यंत त्याने एकही फोन किंवा मेसेज केला नाही."

"९ ला त्याने How are yoy my bebu? असा मेसेज केला होता. पण त्यावेळी मी खूपच दु:खी होती."

"मी दुखावली गेली होती कारण त्याने मला एकही फोन केला नाही. फक्त एक मेसेज केला. मी खूप चिंतेत आहे, आजारी आहे हे त्याला माहित होतं."

"मी माझ्या एका जुन्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की, मी त्याला ९ तारखेला ब्लॉक केलं कारण मला असं वाटलं की त्याला मी त्याच्या आयुष्यात नको आहे."

"सुशांत आणि त्याच्या बहिणींच्यामध्ये मला यायचं नव्हतं. मी त्यात पडायचं नव्हतं."

"सुशांतच्या कुटुंबीयांना याबाबत काहीच माहिती नाही. पण तो त्याच्या कुटुंबाच्या खूप जास्त जवळ होता" असं रियाने म्हटलं आहे.

१४ जून २०२० रोजी सुशांतच्या मृत्यूनंतर त्याची रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर रियावर खूप टीकाही केली गेली.

रियावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. ती जेलमध्येही होती. पण आता ती या परिस्थितीतून हळहळू बाहेर पडत आहे.

अभिनेत्रीने आता आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात केली आहे. ती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते.