In Pics: अलविदा सुशांत...! या बॉलिवूड कलाकारांनी आपल्या लाडक्या मित्राला दिला अखेरचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 18:02 IST2020-06-15T17:47:37+5:302020-06-15T18:02:43+5:30
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत अनंतात विलीन झाला. मुंबईतील विले पार्लेस्थित पवनहंस स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडले.

शांतला अखेरचा निरोप देण्यासाठी त्याचे जवळचे मित्र आणि टीव्ही कलाकार स्मशानभूमीत दाखल झाले होते.
अभिनेत्री श्रद्धा कपूर, अभिनेता अर्जुन बिजलानी हे येथे पोहोचले होते. छिछोरे या चित्रपटात श्रद्धा कपूरने सुशांतसोबत काम केले होते.
छिछोरे चित्रपटात त्याच्यासोबत काम करणारा अभिनेता वरुण शर्मादेखील आपल्या को-स्टारला अलविदा करायला पोहोचला होता.
दिग्दर्शक अभिषेक कपूर पत्नीसोबत स्मशानभूमीत दाखल झाले होते.
अभिनेत्री कृति सेनन ही सुद्धा यावेळी दिसली. कधी काळी तिच्यासोबत सुशांतचे नाव जोडले गेले होते.
स्मशानभूमीच्या बाहेर रस्त्याच्या दुतर्फा चाहत्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याला अलविदा करण्यासाठी गर्दी केली होती.
सुशांतचे वडील केके सिंह, मोठी बहीण आणि चुलतभाऊ आमदार नीरज कुमार हे यावेळी हजर होते.
14 जून रोजी सुशांतने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
विवेक ओबेरॉय यानेही सुशांतला अखेरचा निरोप दिला.
मुंबईत पाऊस असूनदेखील स्मशानभूमीच्या बाहेर रस्त्याच्या दुतर्फा चाहत्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याला अलविदा करण्यासाठी गर्दी केली होती.