श्रीदेवीच्या प्रेमात बुडाला होता हा सुपरस्टार, लग्नही करणार होता पण अचानक लाईट गेली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 15:00 IST2025-07-23T14:00:30+5:302025-07-23T15:00:19+5:30

हा सुपरस्टार श्रीदेवीच्या प्रेमात इतका बुडाला होता की तो तिला लग्नाची मागणी घालणार होता. पण अचानक असं काय घडलं की लग्नाचा विचार त्याने सोडून दिला

श्रीदेवी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. श्रीदेवी आपल्यात नाहीत तरीही त्यांचे सिनेमे आजही आवडीने पाहिले जातात. एक सुपरस्टार अभिनेता श्रीदेवीशी लग्न करण्याच्या तयारीत होता.

रिअल लाईफमध्ये श्रीदेवीचं बोनी कपूरशी लग्न जरी झालं असलं तरीही भारतीय मनोरंजन विश्वातील एक सुपरस्टार अभिनेता तिला प्रपोज करणार होता.

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे रजनीकांत. सुपरस्टार रजनीकांत हा श्रीदेवीच्या आकंठ प्रेमात बुडाला होता. इतकंच नव्हे रजनीकांतने श्रीदेवीशी लग्न करण्याचंही ठरवलं होतं.

एकदा श्रीदेवीच्या नवीन घराचा गृहप्रवेश होता. त्याचवेळी अभिनेत्रीला प्रपोज करायचा विचारही त्याच्या डोक्यात आला. पण नंतर एक अशी गोष्ट घडली, त्यामुळे रजनीकांतने हा विचार सोडून दिला

झालं असं की, गृहप्रवेशाच्या वेळी रजनीकांतने जसं घरात पाऊल ठेवलं तशी लाईट गेली. त्यामुळे रजनीकांतने धास्ती घेतली. हा अपशकून आहे, असं त्याला वाटलं. त्यामुळे तो श्रीदेवीशी काहीही न बोलता तिधून निघून गेला.

रजनीकांतने पुढे १९८१ साली लता रंगाचारी यांच्याशी लग्न केलं. तर श्रीदेवीने १९९६ साली बोनी कपूरशी लग्न केलं.

२४ फेब्रुवारी २०१८ रोजी श्रीदेवीचं अकस्मात निधन झालं. त्यामुळे रजनीकांत यांना मोठा धक्का बसला होता.