Actress In Adipurush: कोण आहे 'आदिपुरुष'मधील सोनल चौहान? बोल्डनेसच्या बाबतीत क्रिती सेनॉनला देतीये टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 16:01 IST2022-04-13T16:00:01+5:302022-04-13T16:01:35+5:30
Sonal chauhan: सोनल सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. त्यामुळे तिची नेटकऱ्यांमध्ये विषय चर्चा रंगत आहे.

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष (Adipurush) हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत येत आहे.
आदिपुरुष या चित्रपटात सैफ अली खान, दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास, क्रिती सेनॉन हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
विशेष म्हणजे या दिग्गज कलाकारांच्या यादीत आणखी एका नव्या अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे. या चित्रपटात एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.
या चित्रपटात अभिनेत्री सोनल चौहान (Sonal Chauhan) ही अभिनेत्री झळकणार असून ती बोल्डनेसच्या बाबतीत क्रिती सेनॉनला टक्कर देत आहेत. त्यामुळे तिची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
सोनल सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. त्यामुळे तिची नेटकऱ्यांमध्ये विषय चर्चा रंगत आहे.
सोनलने आतापर्यंत इन्स्टाग्रामवर तिचे अनेक ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
आदिपुरुषमध्ये सोनलला काम करायची संधी मिळाल्यानंतर तिने तिचं मत मांडलं आहे. "आदिपुरुषचा एक भाग होणं माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. या चित्रपटासाठी मी उत्साही आहे. आतापर्यंत मी जितके चित्रपट केले. त्यापेक्षा हा चित्रपट थोडा वेगळा आहे. आणि. मला विश्वास आहे प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल."
आदिपुरुष हा चित्रपट सोनलचा पहिलाच मायथोलॉजिकल चित्रपट आहे. आदिपुरुष हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.