कोणाला आहे साबणाच्या कलेक्शनचा छंद, तर कुणी पाळलाय अजगर; बॉलिवूड स्टार्सच्या या आहेत विचित्र सवयी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 07:00 AM2022-10-13T07:00:00+5:302022-10-13T07:00:00+5:30

Bollywood Celeb Habbits : प्रत्येकाला काही वाईट सवयी असतात ज्या आपण सोडू शकत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की शाहरुख खानपासून ते करीना कपूरपर्यंत असे अनेक बॉलिवूड स्टार्स आहेत ज्यांना काही विचित्र सवयी आहेत.

प्रत्येकाला काही वाईट सवयी असतात ज्या आपण सोडू शकत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की शाहरुख खानपासून ते करीना कपूरपर्यंत असे अनेक बॉलिवूड स्टार्स आहेत ज्यांना काही विचित्र सवयी आहेत.

जेव्हा तुम्ही तणावाखाली असता तेव्हा तुम्ही तुमचे नखं चावता का? हे करण्यात तुम्ही एकटे नाही आहात. या यादीत बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान(Kareena Kapoor Khan)चाही समावेश आहे. तिला नखे ​​चावण्याची विचित्र सवय आहे.

शाहरुख खान (Shahrukh Khan) बॉलिवूडचा बादशाह असला तरी त्याला अनेक वाईट सवयी देखील आहेत. जसे की तो दिवसातून एकदाच शूज काढतो. किंग खानला व्हिडीओ गेम्स आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचीही आवड आहे. मन्नतमधील त्याचा माळा गेमिंग गॅझेट्सने भरलेला आहे आणि तो त्याच्या मित्रांना स्पर्धांसाठी देखील आमंत्रित करतो.

प्रियंका चोप्रा(Priyanka Chopra)लाही अशी विचित्र सवय आहे जी ती इच्छा असूनही सोडू शकत नाही. वास्तविक, तिला डिझायनर शूज गोळा करण्याची खूप आवड आहे. प्रियांकाकडे डिझायनर शूजच्या ८० जोड्या आहेत.

बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली दीपिका पादुकोण (Deepika Padukone) विमानतळावर एखाद्याकडे टक लावून पाहत असेल तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही. खरेतर, अभिनेत्रीला ही विचित्र सवय आहे की ती विमानतळावर लोकांचे निरीक्षण करते.

अभिनेत्री राणी मुखर्जी(Rani Mukharjee)च्या वाईट सवयींपैकी एक म्हणजे धूम्रपान. तिला इंडस्ट्रीतील चेन स्मोकर अभिनेत्री देखील म्हटले जाते. मात्र, रिपोर्ट्सनुसार, राणीला ही सवय सोडायची आहे.

भाईजान म्हणजेच सलमान खान(Salman Khan)चाही विचित्र सवयी असलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत समावेश आहे. त्याची विचित्र सवय काय आहे हे जाणून घेऊ इच्छिता? तर आम्ही तुम्हाला सांगतो, दबंग खानला साबण गोळा करण्याचा छंद आहे. त्याच्याकडे जगाच्या विविध भागातून गोळा केलेल्या साबणांचा अनोखा संग्रह आहे.

कोणी सापाला पाळीव प्राणी बनवण्याइतपत प्रेम करू शकतो का? याचा विचार करूनही तुमचा थरकाप उडाला असेल ना. पण माजी मिस युनिव्हर्स, सुष्मिता सेन (Sushmita Sen) सापांच्या प्रेमात आहे आणि तिच्या घरात एक पाळीव अजगर देखील आहे. याशिवाय सुष्मिता सेनला तिच्या प्रशस्त बाथरूममध्ये आंघोळ करायला आवडत नाही, त्याऐवजी ती तिच्या ओपन टेरेसवर आंघोळ करणे पसंत करते. तिला ताजी हवा अनुभवायला आवडते पण ही सवय खरोखरच विचित्र आहे.