'...म्हणून एलियन येत नाहीत पृथ्वीवर', रणवीर सिंगच्या लूकने फॅन्ससोबत सेलिब्रेटींनाही घातली भुरळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 16:12 IST2021-06-30T16:05:06+5:302021-06-30T16:12:53+5:30
रणवीर सिंगच्या हटके लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या भूमिकांपेक्षा त्याच्या हटके स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत येत असतो.
रणवीर सिंग नेहमी अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत येत असतो.
रेड कार्पेट असो किंवा फॅशन शो नेहमीच रणवीर सिंग इतरांपेक्षा वेगळ्या अंदाजात आपली छाप उमटवून जातो.
नुकतेच त्याने काही इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी फक्त चाहत्यांनाच नाही तर सेलिब्रेटींनाही भुरळ पाडली आहे.
त्याने GUCCI ब्रॅण्डसाठी फोटोशूट केले आहे.
रणवीरने आकाशी रंगचा टी-शर्ट आणि पँट परिधान केली आहे. त्यावर जॅकेट घातले असून गळ्यात सोन्याच्या चेन घातल्या आहेत.
तसेच रणवीरने पिवळ्या रंगाचा चष्मा लावला आहे.
हे फोटोपाहून चाहत्यांनी रणवीरला अनेक प्रश्न विचारले आहेत. एका यूजरने तर हेच कारण आहे एलियन पृथ्वीवर न येण्यामागचे असे म्हटले आहे.
तर दुसऱ्या एका यूजरने ट्रोल करत पत्नी दीपिका पदूकोणचे कपडे घातले आहेस का ? असे म्हटले आहे.
रणवीरच्या या फोटोवर अनेक कलाकारांनी देखील कमेंट केल्या आहेत.