जिया धडक धडक जाए...! स्मायली सूरीला ओळखणंही झालंय कठीण; कुठे आहे ही अभिनेत्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 06:39 PM2024-06-10T18:39:39+5:302024-06-10T18:55:28+5:30

'कलियुग' फेम अभिनेत्री सध्या काय करते?

'जिया धडक धडक जाए' गाणं आठवलं की त्यातल्या अभिनेत्रीचा तेहरा लगेच डोळ्यासमोर येतो. 'कलयुग' सिनेमातलं हे गाणं आणि स्मायली सूरी (Smilie Suri) हीच ती अभिनेत्री.

2005 साली रिलीज झालेल्या 'कलयुग' सिनेमात स्मायली सूरी आणि कुणाल खेमू यांची जोडी होती. त्यांची केमिस्ट्री सर्वांनाच आवडली. मात्र यानंतर स्मायली एकाएकी गायबच झाली. आता तिचा लूक पाहून कोणी ओळखूही तिला कोणी ओळखूही शकणार नाही.

अभिनेत्री स्मायलीने वैयक्तिक आयुष्यात खूप दु:ख सहन केलं. नुकतंच अभिनेत्री पूजा भटवर आरोप लावत तिच्यामुळेच आपल्याला नंतर सिनेमे मिळाले नाहीत असा दावा केला आहे. स्मायली महेश भट यांची भाची आहे. म्हणजेच ती पूजा भट, आलिया भट आणि इमरान हाश्मीचीही चुलत बहीण आहे.

स्मायलीला आधी डिनो मोरियासोबत 'हॉलिडे' सिनेमातून लाँच करण्यात येणार होतं. मात्र फिल्मच्या शूटिंगला सुरुवात होताच पूजाला स्मायली या भूमिकेसाठी योग्य वाटली नाही आणि तिने स्मायलीला सिनेमातून बाहेर काढलं. यामुळे ती निराश झाली.

२००५ साली मोहित सूरीने तिला 'कलयुग' सिनेमातून लाँच केलं. मात्र नंतर तिला फारशा ऑफर्स मिळाल्या नाहीत.

एकीकडे प्रोफेशनल आयुष्य डगमगलं असताना स्मायलीची भेट डान्स प्रशिक्षक विनीत यांच्याशी झाली. दोघं प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नही केलं. मात्र 2016 साली त्यांचा घटस्फोट झाला. याचा स्मायलीवर वाईट परिणाम झाला आणि ती डिप्रेशनमध्ये गेली. इतकंच नाही तर कुटुंबानेही तिला वेडं ठरवलं.

डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी तिने डान्सचा आधार घेतला. सध्या स्मायली पोल डान्समध्ये पारंगत आहे. ती स्वत:चा डान्स स्टुडिओ चालवते.

याशिवाय तिने इंडस्ट्रीत कमबॅक केले आहे. 'हाऊस ऑफ लाइज' सीरिजमध्ये ती संजय कपूरसोबत झळकली आहे.