वर्ल्ड बेस्ट मॉडेल ते बिग बॉस विजेता, अशी होती ही सिद्धार्थ शुक्लाची कारकीर्द

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 12:08 PM2023-12-12T12:08:00+5:302023-12-12T12:27:07+5:30

लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा आज वाढदिवस आहे.

आज 'बिग बॉस 13'चा विजेता आणि टीव्ही अभिनेता दिवंगत सिद्धार्थ शुक्लाचा वाढदिवस आहे. या निमित्ताने सर्व चाहते त्याला मिस करत आहेत. तो या जगात नसला तरी त्याचे चाहते हा दिवस खूप खास बनवत आहेत.

12 डिसेंबर 1980 रोजी जन्मलेल्या सिद्धार्थ शुक्लाला देशभरात प्रचंड लोकप्रियता मिळाली. सिद्धार्थने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात टीव्ही शोमधून केली, परंतु त्याने अनेक उत्तम चित्रपटांमध्येही काम केले.

सिद्धार्थ शुक्लाला कधीही अभिनेता व्हायचं नव्हतं असं म्हटलं जातं. इंटिरियर डिझायनर होण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्याने इंटिरिअर डिझायनिंगचेही शिक्षण घेतले होते, पण 2004 साली आईच्या आग्रहावरून सिद्धार्थने मॉडेलिंगमध्ये भाग घेतला.

सिद्धार्थ सुरुवातीपासून अतिशय फिटनेस फ्रिक होता. त्याने अतिशय कमी वेळातच मॉडेलिंगच्या जगात आपली ओळख निर्माण केली. 2005 मध्ये तुर्कीमध्ये वर्ल्ड बेस्ट मॉडेलचा पुरस्कार जिंकला होता. यानंतर तो तुफान चर्चेत आला होता.

मेहनतीच्या जोरावर सिद्धार्थने टीव्ही ते सिनेमांपर्यंत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. 'बिग बॉस १३' मध्ये तो सहभागी झाला आणि त्याने तो शो जिंकलाही. 'बिग बॉस १३' जिंकल्यानंतर त्याच्या करिअरला मोठी उंची मिळाली होती.

यानंतर सिद्धार्थने मागे वळून पाहिले नाही. त्याने 2008 मध्ये 'बाबुल का आंगन छूटे ना' या टीव्ही शोमधून अभिनयाला सुरुवात केली. यानंतर तो बालिका बधू, 'दिल से दिल तक' या शोमध्ये दिसला.

सिद्धार्थ आणि शहनाज पहिल्यांदा 'बिग बॉस 13' च्या घरात भेटले, जिथून त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. दोघेही लग्न करतील असे चाहत्यांना वाटत होते. याबाबत त्यांनी अनेकदा आपल्या भावनाही व्यक्त केल्या होत्या.

सोशल मीडियावर 'सिदनाज' म्हणून हे कपल लोकप्रिय होते. पण नियतिच्या मनात मात्र वेगळच होते. 2 सप्टेंबर 2021 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. सिद्धार्थच्या निधनानंतर नेहमी हसतमुख असलेली शहनाज आतून तुटून गेली होती.

सिद्धार्थ शुक्लाचं 2 सप्टेंबर 2021 ला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. छातीत दुखू लागल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, पण तोपर्यंत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं.

आजही सिद्धार्थची आठवण प्रत्येकाला येते. लोकांच्या हृदयात तो कायम आहे.