बायकोपेक्षा 'मेव्हणी' लयभारी! लग्न कियारा अडवाणीचं पण चर्चा तिच्या ग्लॅमरस बहिणीची, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 19:40 IST2023-02-07T12:38:37+5:302023-02-07T19:40:00+5:30
कियारा ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. पण तुम्हाला माहित आहे का की तिची बहीण इशिता देखील सौंदर्याच्या बाबतीत काही कमी नाही.

बॉलिवूडचे लव्हबर्ड सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी आज जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये सात फेरे घेतले. या आलिशान महालात दोघेही नातेवाईक आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले. (फोटो-इन्स्टाग्राम)

या शाही लग्नाला वर्हाडी मंडळीही पोहोचली असून यात करण जोहर, शाहिद कपूर, मीरा कपूर, मनीष मल्हाेत्रा, इशा अंबानी आदींचा समावेश आहे.(फोटो-इन्स्टाग्राम)

कियारा ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. पण तुम्हाला माहित आहे का की तिची बहीण इशिता देखील सौंदर्याच्या बाबतीत काही कमी नाही. होय, कियाराची बहीण आणि सिद्धार्थची मेहुणी इशिता अडवाणी (Sidharth Malhotra Sister In Law) देखील सौंदर्यात कमी नाही. काही महिन्यापूर्वीच इशिताचं लग्न झालं आहे.(फोटो-इन्स्टाग्राम)

मिळालेल्या माहितीनुसार कियारा अडवाणीची बहीण इशिता अडवाणी एक भारतीय वकील आहे. तिने मुंबईच्या सरकारी लॉ कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे. (फोटो-इन्स्टाग्राम)

इशिता अडवाणीच्या पतीबद्दल सांगायचे तर, 5 मार्च 2022 रोजी तिचे लग्न झाले. तसेच तिच्या पतीचे नाव कर्म विवान आहे. तो स्वतः ही व्यवसायाने वकील आहे. (फोटो-इन्स्टाग्राम)

इशिता अडवाणी दिसायला खूपच सुंदर आहे आणि कियाराला ही स्टाईल आणि सौंदर्याच्या बाबतीत टक्कर देते. (फोटो-इन्स्टाग्राम)

एवढेच नाही तर कियारापेक्षा इशिता ३ वर्षांनी लहान आहे. दोघाींमध्ये खूप क्लोज बॉन्डिंग आहे. (फोटो-इन्स्टाग्राम)

















