३९ व्या वर्षीही दिसते २५ ची! श्रद्धा कपूरचं अफलातून फिटनेस रुटीन; 'असा' असतो अभिनेत्रीचा आहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 18:50 IST2026-03-04T18:41:51+5:302026-03-04T18:50:43+5:30

३९ व्या वर्षीसुद्धा श्रद्धा कपूर अगदी २५ वर्षांची असल्यासारखी दिसते.

अभिनेत्री श्रद्धा कपूरनं काल तिचा ३९ वा वाढदिवस साजरा केला. परंतु, ३९ व्या वर्षीसुद्धा श्रद्धा कपूर अगदी २५ वर्षांची असल्यासारखी दिसते.

श्रद्धा कपूर नेहमीच तिच्या नितळ आणि चमकदार त्वचेमुळे कायम चर्चेत असते. मग रेड कार्पेट असो किंवा कॅमेऱ्यामागचा 'नो मेकअप' लूक श्रद्धा कपूरची स्किन नेहमीच फ्रेश आणि ग्लोइंग दिसते.

श्रद्धा कपूरची त्वचा पाहून अनेकांना प्रश्न पडतो की, ती स्किन केअरसाठी नेमकं काय करते? अनेकांना वाटतं की, या सौंदर्यामागे महागड्या स्किन ट्रीटमेंट किंवा परदेशातील ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करत असेल, पण तसं नाही. श्रद्धा कपूरनं पिंकव्हिलाशी संवाद साधताना याबद्दल सविस्तर माहिती दिली होती.

श्रद्धा कपूर नाश्त्याला, दुपारच्या जेवणात आणि रात्री काय खाते अशा एकंदरीत तिच्या डेली रुटीनबद्दल विचारल्यानंतर ती म्हणालेली, "मी भाज्या, डाळ भात आणि पोळ्या खाते. याव्यतिरिक्त कधीकधी मी कॉन्टिनेन्टल आणि इतर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेते. मी संध्याकाळी ६ ते ७ दरम्यान माझं रात्रीचं जेवण उरकून घेते, त्यानंतर मी काही खात नाही, पण जर कधी भूक लागलीच तर मग मी सूप वगैरे पिते".

श्रद्धा कपूर पुढे म्हणाली, “मी सकाळी लवकर उठते आणि नाश्त्यामध्ये माझी स्वयंपाकी उत्तम पदार्थ बनवते. ती उत्तम साबुदाण्याची खिचडी, पोहे, उपमा, मसाला डोसा चटणी सांबार हे सगळं बनवते. हे सगळं खाते". आवडत्या खाद्य संस्कृतीविषयी बोलताना श्रद्धा म्हणाली, "मला भारतीय घरगुती जेवण खायला खूप आवडतं".

अभिनेत्रीला दिवसातून तुला कधी वर्कआउट करायला आवडतं असे विचारल्यानंतर ती म्हणाली, "संध्याकाळी ७ च्या दरम्यान मी व्यायाम करते किंवा दिवसभरात मला जेव्हा असं वाटेल की माझ्यामध्ये व्यायाम करण्यासाठी ऊर्जा आहे, तेव्हा मी व्यायाम करते. काही लोकांना सकाळी व्यायाम करण्यासाठी पुरेशी ऊर्जा आणि ताकद असते, काहींना संध्याकाळी असते".

श्रद्धाने यावेळी ती प्रोसेस्ड फूड आणि तळीव पदार्थ जसे की फ्राइड चिप्स फार खात नाही असं म्हटलं. यावेळी तिने तिला दिवसभरात कधीही हलकीशी भूक लागल्यानंतर ड्रायफ्रूट खायला खूप आवडतात असं सांगितलं.

'लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत स्कीन केअर रूटीनबद्दल विचारल्यानतंर श्रद्धा म्हणालेली, "मी पाणी पिते, पण मला असं वाटतं की मी अजून पाणी प्यायला हवं, त्याने त्वचा चांगली राहते, पुरेशी झोप घेते. त्वचेसाठी तेसुद्धा फार महत्त्वाचं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी असणं. तुम्ही जर आनंदी असाल तर तुमची त्वचा आपोआप खुलते आणि तेच खूप महत्त्वाचं स्कीन केअर आहे".

श्रद्धा कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती दररोज काहीतरी शेअर करत राहते. ती चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याची झलक दाखवत राहते.

श्रद्धा कपूरच्या कामाबद्दल बोलयाचं झालं तर ती लवकरच ईठा सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारीत हा सिनेमा आहे. या सिनेमात श्रद्धा कपूर विठाबाईंची भूमिका साकारत आहे.