धक्कादायक खुलासा ! तू ब्रेस्ट सर्जरी करून घे... असे बरेच सल्ले या मराठमोळ्या अभिनेत्रीलाही दिले गेले होते...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 02:20 PM2022-06-17T14:20:14+5:302022-06-17T14:26:34+5:30

बॉलिवूड आणि मराठमोळ्या अभिनेत्रीने सिनेइंडस्ट्रीबद्दल बरेच धक्कादायक खुलासे केले आहेत.

Radhika Apte: सिनेइंडस्ट्रीच्या काळ्या बाजूबद्दल अनेक कलाकारांनी विशेष करून अभिनेत्रींनी धक्कादायक खुलासे केले आहेत. बॉलिवूड आणि मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिनेदेखील काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

राधिका आपटे ही मूळ पुण्याची असून तिने फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे. मात्र तिचा जन्म वेल्लोर येथे झाला होता. पुण्यातील मराठी नाट्य संस्थेमध्ये तिने कामाला सुरुवात केली. तू, पूर्णविराम, मात्र रात्र आणि कन्यादान इत्यादी मराठी नाटकांमधून तिने अभिनय केला.

अंतहीन या बंगाली चित्रपटांमध्ये तिने बुंदा नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. राधिका आपटे हिने हिंदीमध्ये अनेक चित्रपट केलेले आहेत.

यामध्ये वाह लाईफ हो तो ऐसी, अंतहीन, वेटिंग रूम, रक्तचरित्र, शोर इन द सिटी, कबाली, पॅडमॅन, अंधाधून या सारख्या चित्रपटात तिने काम केले.

लय भारी या चित्रपटातही तिने काम केले. राधिका आपटे आपल्या विचारांसाठी देखील कायमच चर्चेत असते. आपले वेगवेगळे फोटो आणि आपले मत सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडिया वर ती अनेकदा ट्रोल देखील झाली आहे.

आता राधिका आपटे ही पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे राधिका आपटे हिने नुकताच एक खुलासा केला आहे. यामध्ये तिने अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत. यामध्ये बॉलिवूडमध्ये कशाप्रकारे तुमच्याकडून काम करून घेण्यात येते आणि तुम्हाला जर चित्रपटात घ्यायचे नसेल तर तुम्हाला काय सांगितले जाते, हे देखील तिने सांगितले आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यामध्ये तिने सांगितले आहे की, सुरुवातीच्या काळामध्ये मला बॉलिवूडमध्ये येण्यासाठी खूप स्ट्रगल करावे लागले होते.

बॉलिवूडमध्ये येताना अनेकांनी मला वेगवेगळ्या ऑफर दिल्या होत्या. त्याचप्रमाणे वेगवेगळे कृत्य करायला देखील सांगितले होते.

एका चित्रपटामध्ये मी सहभागी होण्यासाठी ऑडिशन दिली. मात्र, ऑडिशन दरम्यान मला दिग्दर्शकाने अतिशय धक्कादायक वक्तव्य करून चकित करून टाकले होते. तुझे ओठ आणि शरीर अजिबात चांगले नाही. त्यामुळे मला तुला चित्रपटात घेता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे एखाद्याच्या शरीरावरून त्याचा अभिनय कसा ठरवता येऊ शकतो, असे म्हटले होते.

त्याचप्रमाणे अनेकांनी मला करिअरच्या सुरुवातीला स्तनाची शस्त्रक्रिया करण्यास देखील सांगितले होते. मात्र, मी असे काही केले नव्हते. त्याचप्रमाणे तुझी त्वचा गोरी करण्यासाठी हजार रुपयाचे इंजेक्शन घे असे देखील सांगण्यात आले होते, असे तिने सांगितले आहे.

राधिका आपटेचे ३.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.