लेकीचा मृत्यू झाल्याचं समजलं, आई-बाबांनी २५ कॉल केले, पण..; अभिनेत्रीने सांगितला अनुभव
By देवेंद्र जाधव | Updated: July 21, 2025 14:19 IST2025-07-21T14:07:10+5:302025-07-21T14:19:18+5:30
हा धक्कादायक किस्सा एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या आयुष्यात घडला. हा किस्सा आठवून आजही अभिनेत्रीच्या अंगावर शहारे उमटतात

कधीकधी काही चुकीच्या बातम्यांचा आणि अफवांचा कलाकारांच्या कुटुंबावर काय परिणाम होईल, याचा विचारच करु शकत नाही. हा किस्साही असाच. जेव्हा अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या मृत्यूची अफवा बाहेर आली
हा किस्सा आहे १९९५ साली घडलेला. शिल्पा शिरोडकर ही रघुवीर सिनेमात सुनील शेट्टीसोबत काम करत होती. त्याचवेळी अचानक शिल्पा शिरोडकरची गोळ्या घालून हत्या, अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली
शिल्पा त्यावेळी मनाली येथे शूटिंग करत होती. लेकीच्या मृत्यूची ही बातमी शिल्पाच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचली. त्यांना प्रचंड धक्का बसला. त्यांनी शिल्पाला फोनवर फोन केले. परंतु शिल्पा शूटिंग करत असल्याने ती फोन घेऊ शकली नाही
जेव्हा शिल्पा पुन्हा रुममध्ये आली तेव्हा तिच्या आई-बाबांचे २०-२५ मिस कॉल आले होते. वर्तमानपत्रात छापून आल्याने शिल्पाच्या आई-बाबांना प्रचंड धक्का बसला.
शिल्पा शिरोडकला नंतर कळालं की सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी निर्मात्यांनी ही बातमी मुद्दाम छापून आणली होती. परंतु यामुळे लेकीच्या काळजीपोटी शिल्पाच्या आई-बाबांचा जीव घाबरा झाला होता.
शिल्पा शिरोडकरने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत हा खास किस्सा सांगितला. आजही हा किस्सा सांगताना आई-बाबांची अवस्था आठवून शिल्पाच्या अंगावर शहारे उठतात