शिल्पा शेट्टी इतकी फिट कशी राहते? अभिनेत्रीच्या सौंदर्याचं आणि फिगरचं सगळ्यांनाच कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 15:48 IST2024-12-09T15:43:15+5:302024-12-09T15:48:55+5:30
शिल्पा शेट्टीनं लेटेस्ट फोटोशूटमध्ये फ्लॉन्ट केली फिगर, पाहा फोटो

अभिनेत्री शिल्पा शेट्टी केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या सौंदर्यानेही अनेकांच्या मनावर राज्य करते.
अभिनेत्री तिच्या लूक आणि फिटनेससाठी नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असते.
41 वर्षीय शिल्पा शेट्टी, दोन मुलांची असूनही इतकी फिट कशी राहते? असा प्रश्न अनेकांना पडतो. शिल्पा शेट्टीच्या सौंदर्याचं आणि फिगरचं सगळ्यांनाच कौतुक आहे.
अलीकडेच शिल्पाने जिममधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
शिल्पानं ब्लॅक क्रॉप टॉप, त्यावर शॉर्ट पँट परिधान केलीय. यात ती कमालीची फिट दिसतेय.
शिल्पाने या फोटोशूटमध्ये फिगर फ्लॉन्ट केलीय. या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
शिल्पा योगसिद्धीत प्रवीण आहे. अवघड योगासनं सहजी करते. ती चाहत्यांनादेखील योगासनं करण्यास आणि निरोगी जीवनशैली टिकवून ठेवण्यास प्रेरित करते.
शिल्पा खूप कठोर वर्कआउट आणि ट्रेनिंग करते. शिल्पाच्या डाएटमध्येही चीट डे आहे. अशा प्रकारे, तिला तिच्या कठोर आहाराचा कधीही कंटाळा येत नाही आणि तिला ब्रेक देखील मिळतो.