'वडापाव'साठी शिल्पा शेट्टीनं डाएटला ठोकला राम-राम, शेअर केले मजेशीर फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 16:33 IST2025-10-07T16:25:53+5:302025-10-07T16:33:04+5:30

शिल्पा शेट्टीनं वडापाव खातानाचा फोटो शेअर केले आहेत, ज्यातून ती चाहत्यांना आपल्यातलीच एक वाटतेय.

बॉलिवूडची फिटनेस क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच आरोग्यदायी जीवनशैली आणि डाएटमुळे चर्चेत असते.

पण, नुकतेच तिने तिच्या डाएटला तात्पुरता ब्रेक देत, तिच्या आवडत्या पदार्थाचा म्हणजेच वडापावचा आनंद घेतला.

शिल्पाने वडापाव खातानाचे काही मजेशीर फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, तिचे कॅप्शन सध्या चर्चेचा विषय बनले आहे.

वडापाव एन्जॉय करतानाचा फोटो शेअर करत शिल्पाने स्वतःला "Forever #BatataVada girl" असं म्हटलं आहे.

पारंपरिक गुलाबी रंगाच्या पोशाखात असलेली शिल्पा तिच्या कारमध्ये बसून गरमागरम वडापाव खाताना दिसत आहे.

तिच्या चेहऱ्यावरील आनंद तिचं वडापाववरील प्रेम स्पष्टपणे दर्शवतंय. तिच्या या पोस्टवर मजेदार कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

शिल्पा शेट्टी ही नेहमीच सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. कामाबद्दल ती चाहत्यांना अपडेट देत असते.

शिल्पा शेट्टीचा 'केडी-द डेव्हिल' हा सिनेमा २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात शिल्पा शेट्टी, संजय दत्त, नोरा फतेही, विजय सेतुपथी, अमजाद कुरेशी अशी स्टारकास्ट आहे.