शशी कपूर यांच्या पत्नी जेनिफर केंडल त्यांना समजायच्या गे, त्यांनीच सांगितली होती ही गोष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 16:46 IST2021-03-18T16:14:49+5:302021-03-18T16:46:30+5:30

शशी कपूर यांचा आज वाढदिवस असून त्यांनी एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले.
शशी कपूर यांचे लग्न जेनिफर केंडल यांच्यासोबत झाले होते. त्यांची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे.
जेनिफर आणि शशी कपूर यांच्या प्रेमकथेविषयी रंजक गोष्टी जेनिफर यांची बहीण फॅलिसीटीने व्हाईट कार्गो या पुस्तकात लिहिल्या आहेत.
या पुस्तकात त्यांनी नमूद केले आहे की, जेनिफर त्याच्या मैत्रिणींसोबत ऑपेरा हाऊसमध्ये नाटक पाहायला गेल्या होत्या. तिथेच शशी कपूर यांनी पहिल्यांदा त्यांना पाहिले आणि पाहाताचक्षणी ते जेनिफर यांच्या प्रेमात पडले.
शशी यांनी जेनिफर यांना पहिल्यांदा पाहिले, त्यावेळी ते स्टार नव्हते. त्यामुळे त्यांना जेनिफर यांच्यासोबत ओळख करायला खूप वेळ लागला.
जेनिफर यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. केवळ त्यांना पाहाण्यासाठी शशी नाटकाला जायचे. पण जेनिफर यांनी त्यांना कधी नोटिस केले नाही.
जेनिफर यांना अनेकवेळा पाहिल्यानंतर शशी यांनी ऑपेरा हाऊसमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.
या भेटीनंतर जेनिफर आणि शशी अनेकवेळा भेटायला लागले आणि काहीच काळात ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
शशी कपूर खूप लाजाळू होते. ते जेनिफरसोबत बोलायला देखील लाजत असे. जेनिफर यांना शशी असे का वागत आहे हे कळत नसल्याने त्या शशी यांना गे समजायला लागल्या होत्या. शशी कपूर यांनी त्यांच्या पुस्तकात या गोष्टीविषयी नमूद केले होते.