IN PICS : शमिता शेट्टी ‘बिग बॉस’मध्ये गेली, फेमस झाली अन् आता म्हणे शो आवडत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 14:40 IST2020-12-17T14:22:02+5:302020-12-17T14:40:04+5:30

‘बिग बॉस’ फॉलो करत असाल तर ‘बिग बॉस’च्या तिस-या सीझनमध्ये दिसलेली अभिनेत्री शमिता शेट्टी तुम्हाला आठवत असेलच.

होय, शिल्पा शेट्टीची बहीण आणि ‘मोहब्बतें’, फरेब, बेवफा अशा अनेक सिनेमांत झळकलेली अभिनेत्री शमिताने ‘बिग बॉस’मधूनच छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतली होती. पण आता हाच ‘बिग बॉस’ हा शो आपल्याला अजिबात आवडत नसल्याचे शमिताने म्हटले आहे.

मी ‘बिग बॉस’ पाहत नाही. कारण मला त्याचा त्रास होतो, असे शमिताने म्हटले आहे. अलिकडेच IANS ला दिलेल्या मुलाखतीत तिने या शोवर जोरदार टीका केली.

इतकेच नाही तर, बिग बॉस हा अत्यंत त्रासदायक रिअ‍ॅलिटी शो आहे. अशा शोमधून कुठल्याही प्रकारचे मनोरंजन होत नाही केवळ मानसिक त्रास होतो,असेही शमिता म्हणाली.

‘बिग बॉस’मध्ये मी स्वत: स्पर्धक म्हणून गेले. पण बाहेर आल्यानंतर माझे स्वत:चे सीझनही मी पाहिले नाही. या शोमधून मनोरंजन नाही तर केवळ मानसिक त्रास होतो, असे शमिता म्हणाली.

केवळ भांडणं, मारामारी, राजकारण आणि अश्लिल भाषेतील संभाषण, हेच या शोमध्ये दिसते. आत्ताचे स्पर्धक तर पूर्वीपेक्षाही अधिक आक्रमक झाले आहे. कमीत कमी मी ज्या सीझनमध्ये गेले, तेव्हा स्पर्धक नियमांचे पालन तर करायचे, असेही ती म्हणाली.

शिल्पा शेट्टीने अपार यश मिळवले. पण तिच्या तुलनेत तिची बहीण शमिता शेट्टी अपयशी ठरली. 2000 मध्ये ‘मोहब्बतें’ चित्रपटातून शमिताने बॉलिवूड डेब्यू केला. ‘मोहब्बतें’ हिट झाला पण शमिता मात्र याचा फार काही लाभ झाला नाही. यानंतर ती काही चित्रपटात दिसली आणि आली तशी गायब झाली.

चित्रपटांत डाळ शिजत नाही म्हटल्यावर शमिताने छोट्या पडद्याकडे मोर्चा वळवला. बिग बॉस 3, खतरों के खिलाडी 9, झलक दिखला जा 8 अशा काही रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती स्पर्धक बनून आली. पण यापश्चातही शमिताला यशाने हुलकावणी दिली.

आज शमिताची ओळख आहे, ती केवळ शिल्पा शेट्टीची बहीण म्हणून. खरे तर शमिताला तिचीच एक चूक नडली. चुकीच्या निर्णयाने तिचे करिअर संपले. होय, खुद्द शमिताने एका मुलाखतीत हे सांगितले होते.

बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ती पर्सनल व प्रोफेशनल लाईफवर बोलली होती. बहिणीसोबत होणा-या तुलनेवरही ती बोलली होती. ती म्हणाली होती, ह्य मी एका हिट चित्रपटाने करिअरची सुरुवात केली. पण दुदैर्वाने माझे करिअर माज्या अपेक्षेनुसार चालले नाही. याचे कारण मी स्वत: आहे. ज्यावेळी माज्याकडे काम होते, त्यावेळी मी ते करायला नकार दिला. मी अतिचोखंदळ झाले. ही माझी चूक होती. पण ही चूक लक्षात येईपर्यंत खूप उशीर झाला होता. इंडस्ट्रीतील नियम पाळले असते...काश... मी आणखी काम केले असते....आजही मला लोक शिल्पा शेट्टीची बहीण म्हणून ओळखतात. कधी कधी तर मला शिल्पा म्हणून हाक मारतात. कारण मी तिच्यासारखी दिसते. पण याचे मला कधीच वाईट वाटले नाही. शिल्पासारख्या एका यशस्वी व्यक्तिसोबत माझी तुलना होत असेल तर मी स्वत:ला भाग्यशाली समजते, असेही शमिता म्हणाली होती.

शमिता शेट्टी सध्या ब्लॅक व्हिडो या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Read in English