३५ वर्षांपूर्वी शाहरुखचा मित्रांसोबत रेल्वेने प्रवास! किंग खानसोबत फोटोत दिसणाऱ्या अभिनेत्रीने केलंय 'जब वी मेट'मध्ये काम
By देवेंद्र जाधव | Updated: May 19, 2025 12:43 IST2025-05-19T12:03:52+5:302025-05-19T12:43:14+5:30
शाहरुखचे ३५ वर्षांपूर्वीचे रेल्वे प्रवासाचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये किंग खानसोबत बॉलिवूड गाजवणारे अभिनेतेही दिसत आहेत. तुम्ही ओळखलं का?

शाहरुख खान हा बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेता. शाहरुख आज यशाच्या शिखरावर असला तरीही सुरुवातीला शाहरुखने संघर्षाचा काळही बघितला आहे
शाहरुख खानचे जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये शाहरुखने केलेला ट्रेन प्रवास दिसून आला.
शाहरुखचे आजवर कधीही न पाहिलेले फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये किंग खानसोबत अजून तीन लोक बघायला मिळत आहेत. हे सर्व शाहरुखचे थिएटरच्या काळातले मित्र आहेत
१९९० च्या काळातील टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते अमर तलवार यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत शाहरुखसोबत आणखी कलाकार पाहायला मिळत आहेत.
शाहरुखसोबत फोटोत दिसणाऱ्या या अभिनेत्याचं नाव आहे रितूराज सिंग. रितूराज आणि शाहरुख चांगले मित्र होते. २०२४ ला रितूराज यांचं निधन झालं.
याशिवाय फोटोमध्ये शाहरुख आणि रितूराज यांच्यासोबत अभिनेत्री दिव्या सेठही पाहायला मिळत आहेत. दिव्या यांनी जब वी मेट सिनेमात शाहिद कपूरच्या आईची भूमिका साकारली होती
शाहरुख आज बॉलिवूडमधील बादशाह म्हणून ओळखला जातो. शाहरुखचे हे फोटो पाहून अनेकांना त्यांच्याही मित्रांसोबतचे कॉलेजचे दिवस आठवले असतील यात शंका नाही