शाहरुख खान-गौरीला नाही वाटत कोरोनाची भीती, हा घ्या पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 19:22 IST2020-03-19T19:12:38+5:302020-03-19T19:22:59+5:30

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे.

कोरोना व्हायरसचा भारतात फैलाव झाल्यानंतर सगळेच मास्क घालून फिरताना दिसत आहेत.

लोकांना कोरोनाची भीती वाटत असली तरी शाहरुखला कोरोनाची भीती वाटत नाही अशीच चर्चा सध्या रंगली आहे.

शाहरुखला नुकतेच करण जोहरच्या घरासमोर पाहाण्यात आले. पण त्याने मास्क घातलेले नव्हते.

शाहरुखसोबत त्याची पत्नी गौरी देखील उपस्थित होती. तिने देखील मास्क घातलेला नसल्याचे दिसले.

गौरी आणि शाहरुख करण जोहरचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. त्यामुळे सध्या चित्रपटांचे चित्रीकरण रद्द झाले असल्याने त्यांनी त्याच्यासोबत क्वॉलिटी टाईम घालवला.

शाहरुख आणि गौरीची मुलगी सुहाना सध्या अमेरिकेत असून कोरोनाचा फटका तिला देखील बसला आहे. तिला घराच्या बाहेर देखील पडला येत नसल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे सांगितले होते.

शाहरुखला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याची एक झलक पाहाण्यासाठी त्याचे फॅन्स आतुरलेले असतात.