इन्स्टावर 33 मिलियन फॉलोअर्स असलेला शाहरूख खान केवळ 6 लोकांना करतो फॉलो, कोण आहेत ते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 12:38 IST2022-12-21T12:24:17+5:302022-12-21T12:38:41+5:30

Shahrukh Khan : इतके फॉलोअर्स असूनही शाहरूख खान हा केवळ 6 लोकांना फॉलो करतो. चला जाणून घेऊ कोण आहेत हे सहा लोक...

भलेही शाहरूख खान त्याच्या आगामी 'पठाण' सिनेमावरून ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. त्याच्या या सिनेमाला वेगवेगळ्या कारणांनी विरोध केला जात आहे. पण असं असलं तरी त्याच्या फॅन फॉलोईंगवर फार काही प्रभाव पडल्याचा दिसत नाही. शाहरूख खानला त्याच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर 33.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. पण हैराण करणारी बाब ही आहे की, इतके फॉलोअर्स असूनही शाहरूख खान हा केवळ 6 लोकांना फॉलो करतो. चला जाणून घेऊ कोण आहेत हे सहा लोक...

गौरी खान -बॉलिवूड किंग शाहरूख खान इन्स्टाग्रामवर त्याची पत्नी गौरी खान हिला फॉलो करतो. गौरीचे इन्स्टाग्रामवर 4.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. गौरी खान सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव असते. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

सुहाना खान - शाहरूख खानच्या फॉलोईंग लिस्टमध्ये त्याची मुलगी सुहाना खान हिचाही समावेश आहे. सुहान लवकरच झोया खानच्या सिनेमातून तिच्या करिअरची सुरूवात करणार आहे. इंस्टाग्रामवर तिचे 3 मिलियन फॉलोअर्स आहेत.

आर्यन खान - मुलगी आणि पत्नीसोबतच शाहरूख खान आपला मुलगा आर्यन खान यालाही फॉलो करतो. आर्यन खानला इन्साग्रामवर 2.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.

पूजा ददलानी - आपल्या परिवारातील सदस्यांसोबतच शाहरूख खान इंस्टाग्राम आपली मॅनेजर पूजा ददलानी हिलाही फॉलो करतो. पूजा त्याच्या फार जवळ आहे आणि ती त्याच्या परिवारातील सदस्यासारखी आहे.

आलिया छिब्बा - आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, आलिया छिब्बा कोण आहे? जिला चक्क शाहरूख खान फॉलो करतो. तर हे असं आहे की, आलिया सुहानाची कजिन आहे आणि आलियाचे इन्स्टावर एकूण 166 हजार फॉलोअर्स आहेत. ज्यात शाहरूख खान आहे. आलिया गौरीच्या भावाची मुलगी आहे.

काजल आनंद - व्यवसायाने वकील काजल आनंद सेलिब्रिटीजच्या केस हॅंडल करते. ज्यात शाहरूख खानच्याही काही केसेस आहेत. त्यामुळे शाहरूख खान काजल आनंद यांना फॉलो करतो.