Sara Ali Khan : सारा अली खानला पुन्हा एक्स बॉयफ्रेंडसोबत करायचाय रोमान्स; 'या' चित्रपटात काम करण्याची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 03:53 PM2023-04-01T15:53:35+5:302023-04-01T16:12:38+5:30

Sara Ali Khan : अभिनेत्री सारा अली खान सध्या अनुराग बासूचा आगामी चित्रपट 'मेट्रो इन डिनो'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

अभिनेत्री सारा अली खान सध्या अनुराग बासूचा आगामी चित्रपट 'मेट्रो इन डिनो'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडचा 'प्रिन्स' म्हणजेच कार्तिक आर्यनही अनुराग बसूसोबत 'आशिकी 3'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. याच दरम्यान आता साराने खुलासा केला आहे.

'आशिकी 3'साठी अद्याप एकही फीमेल लीड फायनल झालेली नाही. त्याचवेळी सारा अली खानने आता कार्तिक आर्यन स्टारर चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कनेक्ट एफएमशी संवाद साधताना, अभिनेत्रीने कार्तिक आर्यनच्या 'आशिकी 3' चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

सारा म्हणाली, "मला अद्याप 'आशिकी 3' ऑफर करण्यात आलेली नाही, परंतु मला या चित्रपटाची ऑफर आली तर मला आवडेल, होय, नक्कीच." आशिकी 3 चे निर्माते या चित्रपटासाठी सारासोबत चर्चा करत असल्याचा दावा नुकताच बॉलिवूड हंगामाने आपल्या एका रिपोर्टमध्ये केला होता.

रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, ते तिसऱ्या लीडसाठी दुसऱ्या महिला अभिनेत्रीच्या शोधात आहेत. या वृत्तानंतर जवळपास महिनाभरानंतर साराने आता 'आशिकी 3'मध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले आहे.

2020 मध्ये आलेल्या 'लव्ह आज कल 2' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कार्तिक आर्यन आणि सारा अली खान एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, नंतर दोघे वेगळे झाल्याच्या बातम्या आल्या.

गेल्या वर्षी जेव्हा सारा 'कॉफी विथ करण' मध्ये दिसली तेव्हा चित्रपट निर्माता करण जोहरने पुष्टी केली होती की सारा आणि कार्तिक आर्यनमध्ये काहीतरी आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सारा आणि कार्तिक राजस्थानच्या उदयपूरमध्ये एकत्र दिसले होते. दोघांचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना कार्तिकने सिद्धार्थ काननला सांगितले की, "आम्ही त्याच ठिकाणी होतो म्हणून कोणीतरी आमचा फोटो काढला. आमचे फोटो काढणारे बरेच लोक होते. एक-दोनच फोटो समोर आली याचे मला आश्चर्य वाटते."

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सारा अली खानचा 'गॅसलाइट' रिलीज झाला आहे. ती सध्या आदित्य रॉय कपूर, अनुपम खेर, पंकज त्रिपाठी आणि अली फजलसोबत 'मेट्रो इन डिनो'चे शूटिंग करत आहे.

कार्तिक आर्यन शेवटचा मोठ्या पडद्यावर क्रिती सेननसोबत 'शेहजादा'मध्ये दिसला होता. अभिनेत्याचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कार्तिक आणि कियारा अडवाणीची जोडी दिसणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.