संस्कारी मुलीसाठी लग्नाचे प्रपोजल आहे का असे विचारत सारा अली खानने शेअर केले ब्रायडल लूकमधील फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 13:45 IST2021-03-20T13:22:23+5:302021-03-20T13:45:26+5:30

सारा अली खानने नुकतेच ब्रायडल लूकमध्ये फोटोशूट केले असून हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
घरेलू, संस्कारी मुलीसाठी लग्नाचे प्रपोजल आहे का असे तिने या फोटोसोबत लिहिले आहे.
या लूकमध्ये सारा अली खान खूपच छान दिसत असल्याचे तिचे चाहते तिला सांगत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
सारा अली खानने केदारनाथ या चित्रपटाद्वारे तिच्या फिल्मी करियरला सुरुवात केली. (फोटो: इंस्टाग्राम)
सारा अली खानच्या अभिनयाइतकीच तिच्या सौंदर्याची चर्चा रंगते. (फोटो: इंस्टाग्राम)
सारा अली खान नुकतीच कुली नं.1 या चित्रपटात वरुण धवन सोबत दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
सारा अली खानला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने सोशल मीडियावर फॉलो करतात. (फोटो: इंस्टाग्राम)