सारा अली खान आणि विक्रांत मेस्सीने घेतले नागेश्वर ज्योतीर्लिंगाचे दर्शन, 'गैसलाइट'च्या शूटिंगआधी घेतले आशिर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 02:41 PM2022-04-01T14:41:29+5:302022-04-01T14:41:29+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) सोबत 'गैसलाइट' चित्रपटाचे गुजरातमध्ये शूटिंग करत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या अभिनेता विक्रांत मेस्सी सोबत 'गैसलाइट' चित्रपटाचे गुजरातमध्ये शूटिंग करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच सारा अली खानने इंस्टाग्रामवर नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आणि त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी तिच्यासोबत विक्रांत मेस्सी देखील पाहायला मिळतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोत सारा अली खानने व्हाइट रंगाचा पंजाबी ड्रेस घातला आहे आणि कपाळावर टिळा लावला आहे. डोक्यावर ओढणी घेतली आहे. तर विक्रांत निळ्या रंगाचा शर्ट आणि डेनिममध्ये दिसतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत साराने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'नाइस टू हैव यू माझ्यासोबत, फिल्मिंग, इंस्पायरिंग, होल्डिंग माय हॅण्ड. सोबत रहा आणि प्रत्येक वेळेला मदत करा. धन्यवाद. जय भोलेनाथ. (फोटो: इंस्टाग्राम)

सारा अली खानने केदारनाथ चित्रपटातून बॉलिवू़डमध्ये पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

सारा अली खान शेवटची अतरंगी रे चित्रपटात पाहायला मिळाली. या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले. (फोटो: इंस्टाग्राम)